व्हिटॅमिन ई च्या कमतरतेमुळे शरीरात दिसतात ‘ही’ लक्षणे
व्हिटॅमिन ई हे आपल्या शरीरासाठी अतिशय महत्वपूर्ण असते. शरीरात त्याची कमतरता निर्माण झाल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
1 / 5

व्हिटॅमिन ई हे निरोगी रोगप्रतिकारक शक्तीसाठी महत्वाचे असते. हे व्हिटॅमिन केवळ आपली त्वचा आणि केस नाही तर स्नायूंसाठीही महत्वपूर्ण असते. लो-फॅट डाएटमुळे याची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे शरीरावर काय परिणाम होतो हे जाणून घेऊया.
2 / 5

वारंवार आजारी पडणे - व्हिटॅमिन ईची कमतरता असेल तर तुम्ही वारंवार आजारी पडू शकता आणि ऋतूमानानुसार प्रत्येक आजाराची शिकार होऊ शकता.
3 / 5

स्नायू कमजोर होणे व वेदना होणे - तुमच्या शरीरात व्हिटॅमिन ईची कमतरता असेल तर स्नायू खूप कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे शरीरात खूप वेदनाही होऊ शकतात.
4 / 5

दृष्टीवर परिणाम - व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे लोकांना डोळ्यांसंदर्भात समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. यामुळे दृष्टी मंदावू शकते.
5 / 5

वारंवार उलटी होणे - व्हिटॅमिन ईची कमतरता असेल तुम्हाला वारंवार उलटी होणे, जुलाब होणे असे त्रास होऊ शकतात.
Follow Us