TMKOC : अभिनयाआधी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचे बागा काय काम करायचे ?

Taarak Mehta Ka Ooltah Chashma: लोकप्रिय टीव्ही मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधील सर्व कलाकारांवर चाहत्यांचे प्रेम आहे. बागाचे कॅरेक्टर साकारणारे तन्मय वेकारिया यांना देखील खूप पसंद केले जाते. मात्र, अभिनय क्षेत्रात येण्याआधी ते काय करायचे हे फार कमी लोकांना माहिती आहे.

| Updated on: Jun 12, 2026 | 11:02 PM
1 / 5
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Baga: सिटकॉम टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील अनेक अभिनेत्यांना देशभरात लोकप्रियता दिली आहे. यात एक नाव तन्मय वेकारिया याचं देखील आहे. तन्मय या मालिकेत बागा कॅरेक्टर साकारतात. बागा हे जेठालाल याच्या दुकानात काम करताना दिसतात.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Baga: सिटकॉम टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील अनेक अभिनेत्यांना देशभरात लोकप्रियता दिली आहे. यात एक नाव तन्मय वेकारिया याचं देखील आहे. तन्मय या मालिकेत बागा कॅरेक्टर साकारतात. बागा हे जेठालाल याच्या दुकानात काम करताना दिसतात.

2 / 5

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या आधी तन्मय 'FIR', 'ढूंढते रह जाओगे'सारख्या शोमध्ये ही दिसले. मात्र, त्यांना खरी ओळख तारक मेहताने दिली. आज त्यांना लोक त्यांच्या खऱ्या नावाने कमी पण बागा कॅरेक्टरच्या नावाने प्रसिद्ध आहेत.

3 / 5

तन्मय वेकारिया हे अभिनय क्षेत्रात येण्याच्या आधी एका बँकेत नोकरी करीत होते. जेथे त्यांना महिन्याला केवळ ४ हजार रुपयांची सॅलरी मिळते. परंतू आज तन्मय ऊर्फ बागा 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेसाठी मोठी बिदागी स्वीकारतात.

4 / 5

बातम्यानुसार तन्मय वेकारिया यांना 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या एका भागासाठी २२ हजार रुपयांची फी मिळते. ते या मालिकेचे कायमस्वरुपी कॅरेक्टर मानले जातात. त्यामुळे या शोमधून ते महिन्याला पाच लाखाहून अधिकची कमाई करतात.

5 / 5

या मालिकेचे महिन्याला २६ भाग टेलिकास्ट होतात. बागाचा कॅरेक्टर बहुतांशी एपिसोडमध्ये असतात. त्यांचे कॅरेक्टर आणि त्यांच्या बोलण्याचा अंदाज लोकांना खूप आवडतो. ही मालिका साल २००८ पासून सुरु आहे. तन्मय या मालिकेशी साल २०१० मध्ये जोडले गेले. १६ वर्षांत त्यांना या मालिकेने प्रचंड प्रसिद्धी दिली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us