Iran Israel War : युद्धात काहीतरी भयंकर घडणार, इराणच्या बड्या नेत्याच्या धमकीने खळबळ, थेट डोनाल्ड ट्रम्प यांना…

इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह अली खामेनेई यांचा अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर जगभरात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, खामेनेई यांच्यानंतर आता आणखी एक नाव जगभरात चर्चीले जात आहे. हे नाव आहे अली लारीजानी असे आहे.

| Updated on: Mar 04, 2026 | 10:11 PM
1 / 5

2 / 5

अली लारीजानी हे इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव आहेत. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर लारीजानी यांनी आता अमेरिकेला सर्वात मोठी धमकी दिली आहे. या धमकीमुळे जगाची चिंता वाढली आहे. भविष्यात काही मोठं घडणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

3 / 5

मिळालेल्या माहितीनुसार अली लारीजानी यांनी अमेरिकेला उघड धमकी दिली आहे. अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूचा आम्ही बदला घेऊ, असे अली लारीजानी म्हणाले आहेत. सोबतच अमेरिकेला या गुन्ह्याची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिलाय.

4 / 5

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन जनतेला विश्वासघात केला आहे. इस्रायलने डोनाल्ड ट्रम्प यांना फसवलं आहे. त्यामुळेच अमेरिकेच्या 500 सैनिकांचा मृत्यू झाला आहे, असेही लारीजानी म्हणाले आहेत. दरम्यान, इराणनेही आक्रमक पवित्रा धारण केल्यामुळे युद्ध आणखी भडकणार असल्याचे बोलले जात आहे.

5 / 5

इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. त्यामुळे संपूर्ण जगापुढे इंधनसंकट निर्माण झाले आहे. कच्च्या तेल्याचा पुरवठा होत नसल्याने भारतासह अनेक देशांत इंधनाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us