India’s First Sleep Champion: त्रिपर्णा चक्रवर्ती, भारताची पहिली स्लीप चॅम्पियन! कधी बोर्डाच्या पेपरमध्ये, कधी मुलाखतीत झोपली, चीज झालं!

| Updated on: Sep 07, 2022 | 2:37 PM

लहानपणापासूनच त्रिपर्णाला झोपायला खूप आवडतं. तिचे झोपेचे अनेक किस्से आहेत. ती कधी बोर्डाची परीक्षा देताना परीक्षा केंद्रात झोपायची, तर कधी नोकरीसाठी मुलाखत देताना झोपून जायची.

1 / 5
झोपायला आवडतं का? झोपेची स्पर्धा असू शकते असं जर कुणी सांगितलं तर विश्वास बसणार नाही. त्रिपर्णा चक्रवर्ती ही भारताची पहिली स्लीप चॅम्पियन बनलीये. तिला ही स्पर्धा जिंकल्यावर तब्बल 5 लाख रुपयांचं बक्षीस मिळालंय.

2 / 5
लहानपणापासूनच त्रिपर्णाला झोपायला खूप आवडतं. तिचे झोपेचे अनेक किस्से आहेत. ती कधी बोर्डाची परीक्षा देताना परीक्षा केंद्रात झोपायची, तर कधी नोकरीसाठी मुलाखत देताना झोपून जायची. सोशल मीडियावर झोपण्याच्या स्पर्धेबद्दल त्रिपर्णाला माहिती मिळाली.

3 / 5
नुकतीच एका महागड्या गादी उत्पादक कंपनीने एक स्पर्धा घेतली. त्या स्पर्धेत त्रिपर्णाने सलग 100 दिवस रोज 9 तास झोपून सर्वोत्तम स्लीपरचा पुरस्कार पटकावला. देशभरातील सुमारे साडेपाच लाख स्पर्धकांनी या झोपेच्या स्पर्धेत भाग घेतला होता.

4 / 5
त्रिपर्णा एका अमेरिकन कंपनीत काम करते. सलग 100 दिवसात 9 तास झोपणारी त्रिपर्णा ही पहिली व्यक्ती आहे. अंतिम सामन्यादरम्यान झोपेवर लक्ष ठेवण्यासाठी संघटनेचे एक शिष्टमंडळ त्रिपर्णाच्या घरी पाठविण्यात आले होते.

5 / 5
उरलेल्यांना मागे टाकून त्रिपर्णाने झोपेच्या स्पर्धेचा मुकुट जिंकला. संस्थेच्या म्हणण्यानुसार, 100 दिवसांच्या या चॅलेंजमध्ये प्रत्येक स्पर्धकाला 9 तास झोपावे लागले. प्रत्येक स्पर्धकाच्या स्लीप स्कोअरमध्ये त्रिपर्णाने सर्वाधिक गुण मिळवले. तिचा स्लीप स्कोअर 100 पैकी 95 होता.