
टीव्ही अभिनेत्री आपल्या अभिनयाने मन जिंकून घेतात. सोबतच ग्लॅमर दाखवून चर्चेत येतात. सोशल मीडियावर या अभिनेत्री पूर्णपणे सक्रीय असतात. अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्याकडे बऱ्याच काळापासून काम नाहीय. पण, तरीही त्या भरपूर कमाई करतात. आज आम्ही तुम्हाला टीव्हीच्या अशाच अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जी श्वेता तिवारीनंतर आपल्या वेकेशनमुळे चर्चेत आहे.

ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून 'बिग बॉस 18' ची कंटेस्टंट आहे. जिने आपल्या अभिनयाने फॅन्सना इम्प्रेस केलय. टीव्हीशिवाय तेलगू, हिंदी, तामिळ. मल्याळम आणि कन्नड भाषेतील चित्रपटातही काम केलं आहे. सध्या ती थायलंडच्या बीचवरील ग्लॅमरस फोटो पोस्ट करत आहे.

आम्ही 38 वर्षांच्या नायरा बॅनर्जीबद्दल बोलत आहोत. ती दीर्घकाळापासून टीव्हीमध्ये काम करत आहे. तिचा तगडा फॅन बेस आहे. तेलुगु फिल्ममधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या या अभिनेत्रीने नुकतेच मोनोकिनीमधील फोटो शेअर केले होते.

तिने पॉपुलर शो 'दिव्या दृष्टि' मध्ये काम केलं होतं. याच शो मधून तिला घराघरात ओळख मिळाली. शो मध्ये ती दिव्याचा रोल करायची. तिच्याकडे पाच खास शक्ती असतात. दोन बहिणींचा हा शो हिट ठरलेला. त्याशिवाय कलर्सवरील शो पिशाचिनीमध्ये सुद्धा ती दिसलेली.

नायरा बॅनर्जी रोहित शेट्टीचा शो 'खतरों के खिलाड़ी 13' मध्ये सुद्धा दिसलेली. ती बिग बॉस 18 मध्ये सुद्धा काही खास करु शकली नव्हती. शो शिवाय ती म्यूझिक व्हिडिओमध्ये सुद्धा दिसलेली. अभिनेत्री इन्स्टाग्रामवर सुद्धा एक्टिव असते. तिथे ती प्रमोशनल पोस्ट सुद्धा शेअर करत असते.