AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

275 कोटींच्या ‘धुरंधर 2’मध्ये कोणाला सर्वाधिक मानधन? सर्वांत कमी फी मिळाली या भूमिकेला

'धुरंधर 2' पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटात रणवीर सिंहसोबत संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन, सारा अर्जुन यांच्याही भूमिका आहेत. या भूमिकांसाठी त्यांनी किती मानधन घेतलं, ते जाणून घ्या..

275 कोटींच्या 'धुरंधर 2'मध्ये कोणाला सर्वाधिक मानधन? सर्वांत कमी फी मिळाली या भूमिकेला
Dhurandhar 2 Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 17, 2026 | 2:02 PM
Share

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या 19 मार्च रोजी हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 18 मार्च रोजी ‘धुरंदर 2’चे पेड प्रिव्ह्यूज असतील. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. ‘धुरंधर 2’च्या ॲडव्हान्स बुकिंगलाही सुरुवात झाली असून या चित्रपटाचे अनेक शोज हाऊसफुल झाले आहेत. तब्बल 275 कोटी रुपये बजेटमध्ये बनलेल्या या मल्टीस्टारर चित्रपटात रणवीर सिंह, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुन यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत. या भूमिकांसाठी प्रत्येक कलाकाराने किती मानधन घेतलंय, त्याबद्दल जाणून घेऊयात.

‘एशिया नेट’ने दिलेल्या वृत्तानुसार ‘धुरंधर 2’साठी रणवीर सिंहने तब्बल पन्नास कोटी रुपये मानधन स्वीकारलं आहे. या चित्रपटातील तो सर्वाधिक फी घेणारा अभिनेता ठरला आहे. रणवीर या चित्रपटात हमजा आणि जसकीरत सिंह रंगी अशा दोन भूमिकांमध्ये झळकणार आहे. तर चौधरी असलमच्या भूमिकेतील संजय दत्तने दहा कोटी रुपये मानधन घेतल्याचं कळतंय. संजय दत्तची या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अभिनेता अर्जुन रामपाल यामध्ये अत्यंत क्रूर खलनायकाच्या भूमिकेत आहे. या भूमिकेसाठी त्याने एक कोटी रुपये मानधन घेतलं आहे. अर्जुनने यामध्ये इलियास काश्मिरीची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री सारा अर्जुनने या चित्रपटातील भूमिकेसाठी एक कोटी रुपये फी घेतलं आहे. यलिना जमालीच्या भूमिकेतील साराला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं आहे. आता ‘धुरंदर 2’मध्ये ती हमजाच्या पत्नीच्या भूमिकेत आहे.

अभिनेता आर. माधवन या चित्रपटात अजय सन्यालच्या भूमिकेत आहे. यासाठी त्याने नऊ कोटी रुपये फी घेतली आहे. ‘धुरंधर’ या चित्रपटातील अक्षय खन्नाच्या भूमिकेची सर्वाधिक चर्चा झाली होती. अक्षयने साकारलेल्या रहमान डकैत या भूमिकेचा पहिल्या भागात मृत्यू दाखवण्यात आला होता. परंतु आता दुसऱ्या भागात तो फ्लॅशबॅक सीन्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यासाठी त्याने दोन कोटी रुपये मानधन घेतल्याचं कळतंय. ‘धुरंधर’चा पहिला भाग डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली होती.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं