AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाना पटोलेंकडून भूमाफियाचा शिक्का, भाजप आमदार संतापला, म्हणाला मविआ काळात…

नाना पटोले यांनी केलेले स्टॅम्प ड्युटी घोटाळ्याचे आरोप भाजप नेते नरेंद्र मेहता यांनी फेटाळून लावले आहेत. ही योजना मविआ काळातीलच असून राजकीय हेतूने सुपारी घेऊन आरोप केले जात असल्याचे मेहता यांनी म्हटले आहे.

नाना पटोलेंकडून भूमाफियाचा शिक्का, भाजप आमदार संतापला, म्हणाला मविआ काळात...
nana patole narendra mehta
| Updated on: Mar 17, 2026 | 1:49 PM
Share

मीरा भाईंदरचे आमदार आणि भाजप नेते नरेंद्र मेहता यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लावलेले सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. नाना पटोले यांनी मंत्र्यांना पत्र लिहून मेहता यांच्यावर भूमाफिया असल्याचा शिक्का मारला असून स्टॅम्प ड्युटी (मुद्रांक शुल्क) घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. यावर नरेंद्र मेहता यांनी प्रत्युत्तर दिले आहे. माझा अशा प्रकारचा कोणताही घोटाळा झालेला नाही, हे सर्व व्यवहार अत्यंत पारदर्शक आहेत. माझ्यावरील स्टॅम्प ड्युटी घोटाळ्याचे आरोप पूर्णपणे बिनबुडाचे असून, राजकीय शत्रूंनी दिलेल्या सुपारीवरूनच ही चिखलफेक केली जात आहे, अशा शब्दात नरेंद्र मेहता यांनी प्रत्युत्तर दिले.

कोणतेही मुद्रांक शुल्क थकलेले नाही

नरेंद्र मेहता यांनी नुकतंच विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिले. ज्या योजनेचा उल्लेख केला जात आहे, ती योजना खुद्द महाविकास आघाडी सरकारच्या काळात नाना पटोले सभापती असतानाच आणली गेली होती. जर या योजनेत काही त्रुटी असतील, तर मविआ सरकारने बिल्डरांना खूश करण्यासाठी ही योजना आणली होती का, याचा खुलासा नाना पटोले यांनीच करावा. माझ्या नावावर आमदार होण्यापूर्वी केवळ एकच जागा होती आणि तिची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आमची कोणतीही मुद्रांक शुल्क (Stamp Duty) थकलेली नाही, असे नरेंद्र मेहता म्हणाले.

सातत्याने खोट्या तक्रारी करतात

आमच्याकडे ४-५ लोक असे आहेत जे निव्वळ ब्लॅकमेलर आणि चीटर आहेत. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून ते केवळ तक्रारी करण्याचे काम करतात. हे पेड वर्कर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सातत्याने खोट्या तक्रारी करत असतात, मात्र त्यात कोणतेही तथ्य नसते,” असा गंभीर आरोपही मेहता यांनी केला.

मिरा भाईंदरमध्ये काँग्रेसचे अस्तित्व आम्ही संपवले आहे, याचाच राग मनात धरून स्थानिक नेते नाना पटोलेंना चुकीची माहिती पुरवत आहेत. ५-६ महिने जुन्या पत्राचा आधार घेऊन केवळ राजकीय द्वेषापोटी हे आरोप केले जात असल्याचे नरेंद्र मेहता यांनी म्हटले. दरम्यान, रुग्णालयात उंदीर चावल्याने झालेल्या मृत्यूच्या घटनेवर मेहता यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ही अत्यंत गंभीर बाब असून संबंधित डॉक्टरांवर कडक कारवाई व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप नेते नरेंद्र मेहता यांच्यावर भूमाफिया असल्याचा शिक्का मारत गंभीर आरोप केले होते. नरेंद्र मेहता यांनी मुद्रांक शुल्क घोटाळा केल्याचा दावा पटोले यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी मंत्र्यांना पत्र लिहून केली होती. त्यावर आता नरेंद्र मेहतांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Follow Us
ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने ख
ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने ख.
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद.
आढावा बैठकीत शेजारी बसूनही शिरसाट, सत्तारांचा अबोला, भर मंचावर...
आढावा बैठकीत शेजारी बसूनही शिरसाट, सत्तारांचा अबोला, भर मंचावर....
एका युगाचा अंत! अजरामर गीतांना स्वर देणाऱ्या आशाताईंचा अल्पपरिचय
एका युगाचा अंत! अजरामर गीतांना स्वर देणाऱ्या आशाताईंचा अल्पपरिचय.
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज.
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ.
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध.
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा.
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?.
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्.