AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात अंड्यांच्या किमतीत 30-40% घसरण, मध्यपूर्वेतील तणावाचा भारतीय बाजारावर परिणाम, 100 अंड्यांची किंमत फक्त…

मध्यपूर्वेतील संघर्षामुळे भारतीय बाजारावर देखील मोठा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. याचा परिणाम अंड्यांच्या किमतीत झाला असून त्या थेट 30 ते 40 टक्क्याने घसरल्या आहेत.

भारतात अंड्यांच्या किमतीत 30-40% घसरण, मध्यपूर्वेतील तणावाचा भारतीय बाजारावर परिणाम, 100 अंड्यांची किंमत फक्त...
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 17, 2026 | 1:42 PM
Share

देशभरात अंड्यांच्या किमतीत अचानक 30 ते 40 टक्क्यांची घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असला तरी व्यापाऱ्यांसाठी ही परिस्थिती चिंतेची ठरत आहे. या बदलामागे स्थानिक कारण नसून मध्यपूर्वेतील वाढता भू-राजकीय तणाव हे मुख्य कारण असल्याचे समोर येत आहे.

सध्या भारतीय पोल्ट्री उद्योगासाठी परिस्थिती अस्थिर बनली आहे. मध्यपूर्वेतील संघर्षामुळे खाडी देशांकडे होणाऱ्या अंड्यांच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान निर्यात ठप्प झाल्याने मोठ्या प्रमाणात अंडी देशांतर्गत बाजारात उपलब्ध झाली असून त्याचा थेट परिणाम किमतींवर झाला आहे.

बाजारात अंड्यांची किंमत प्रतिअंडा सुमारे 7 रुपयांवरून घसरून 5 रुपयांपर्यंत आली आहे. म्हणजेच 100 अंडी सुमारे 500 रुपयांत उपलब्ध होत आहेत. किरकोळ बाजारातही अंड्यांच्या दरात घट झाली असून, पूर्वी 8 ते 9 रुपयांना विकले जाणारे अंडे आता 5.50 ते 6 रुपयांच्या दरम्यान मिळत आहे.

1 कोटी अंड्यांची निर्यात बंद

या घसरणीमागे मध्यपूर्वेतील वाढते तणावपूर्ण वातावरण कारणीभूत आहे. सुरक्षेच्या कारणांमुळे आणि वाहतूक मार्गांमध्ये अडथळे निर्माण झाल्याने संयुक्त अरब अमिरात, ओमान, कतार आणि बहरेन यांसारख्या देशांशी होणारा व्यापार मोठ्या प्रमाणात बंद झाला आहे.

उद्योगातील आकडेवारीनुसार, या संकटापूर्वी भारतातून खाडी देशांकडे दररोज सुमारे 1 कोटी अंड्यांची निर्यात केली जात होती. विशेष म्हणजे भारतातील एकूण निर्यातयोग्य अंड्यांपैकी जवळपास 80 टक्के अंडी ही केवळ खाडी देशांकडे पाठवली जात होती. मात्र सध्या निर्यात थांबल्यामुळे हा मोठा साठा देशांतर्गत बाजारात आणला जात आहे. ज्यामुळे पुरवठा मागणीपेक्षा जास्त झाला आहे.

सामान्य ग्राहकांना दिलासा

या परिस्थितीत व्यापाऱ्यांना तोटा सहन करावा लागत असला तरी सामान्य ग्राहकांसाठी ही दिलासादायक बाब आहे. किमती कमी झाल्यामुळे अंड्यांची मागणी पुन्हा वाढू लागली आहे. महागाईमुळे अंडी खरेदी कमी केलेल्या अनेक कुटुंबांनी आता पुन्हा अंड्यांचा आहारात समावेश करण्यास सुरुवात केली आहे.

अंडे हे पोषणमूल्यांनी समृद्ध अन्न मानले जाते. ज्यामध्ये व्हिटॅमिन A, D, E, B12 यांसह आयर्न आणि सेलेनियम मोठ्या प्रमाणात असते. प्रति 100 ग्रॅम अंड्यामध्ये सुमारे 12.6 ग्रॅम प्रथिने आणि 155 कॅलरीज असतात. त्यामुळे ते संतुलित आणि किफायतशीर आहाराचा उत्तम पर्याय ठरते.

Follow Us
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल