AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गिरीश महाजन - विजय चौधरी कथित ऑडिओ प्रकरणाला धक्कादायक वळण! स्वीय सहाय्यकानेच... भाजपमध्ये मोठ्या घडामोडी

गिरीश महाजन – विजय चौधरी कथित ऑडिओ प्रकरणाला धक्कादायक वळण! स्वीय सहाय्यकानेच… भाजपमध्ये मोठ्या घडामोडी

| Updated on: Aug 01, 2026 | 11:21 AM
Share

भाजपाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संबंधित कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना वेग आला आहे. या कथित क्लिपमध्ये एकनाथ खडसे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

दरम्यान, या प्रकरणात आता नव्या घडामोडी समोर आल्या आहेत. ताज्या माहितीनुसार, विजय चौधरी यांचे स्वीय सहाय्यक यश टिपरे याच्यावर कथित ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, यश टिपरे सोशल मीडिया हँडलर आणि स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होता. याच काळात विजय चौधरी यांच्या मोबाईलमधील डेटा चिपमध्ये साठवून घेतल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. इतकेच नाही तर आणखी काही ऑडिओदेखील व्हायरल केल्याचा संशय आहे. या प्रकरणात आणखी काही जण तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याचीही चर्चा आहे. संशयित यश टिपरे याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पुढील तपासानंतर या प्रकरणात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Published on: Aug 01, 2026 11:21 AM

Follow Us