AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान मोदींच्या आणखी एका व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ! त्या कृतीने वेधलं लक्ष

पंतप्रधान मोदींच्या आणखी एका व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ! त्या कृतीने वेधलं लक्ष

| Updated on: Aug 01, 2026 | 10:41 AM
Share

जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान काही आंदोलकांकडून वापरण्यात आलेल्या आक्षेपार्ह भाषेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली. मात्र, या प्रकरणात आंदोलकांवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांना योग्य दिशा देण्याची गरज असल्याचे मोदी यांनी म्हटले.

जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान काही आंदोलकांकडून वापरण्यात आलेल्या आक्षेपार्ह भाषेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली. मात्र, या प्रकरणात आंदोलकांवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांना योग्य दिशा देण्याची गरज असल्याचे मोदी यांनी म्हटले. तसेच त्यांनी आंदोलकांना माफ करण्याची भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या या कृतीने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत, आंदोलकांच्या वक्तव्यांमुळे समाजात निर्माण झालेला आक्रोश आपण समजू शकतो, असे मोदी म्हणाले. मात्र, संबंधित तरुणांना शिक्षा करण्यापेक्षा त्यांना समजावून योग्य मार्ग दाखवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मोदी म्हणाले, “समाजात जो आक्रोश आहे त्याला मी व्यवस्थितपणे समजू शकतो. हा एकप्रकारचा सांस्कृतिक धक्का आहे, आमच्या मुली अशाप्रकारची भाषा कशी वापरु शकतात? पण, या मुलांना मिठीत घेऊन, योग्य रस्ता दाखविण्याची हीच वेळ आहे. ही दिशा भरकटलेली मुलं आहेत, त्यांना योग्य रस्ता दाखवणं आपलं काम आहे. त्यांना शिक्षा देणं, न्यायालयाच्या फेऱ्या मारायला लावणं यामुळे परिस्थिती बदलणार नाही, मला त्यांना माफ करायचंय”, असे मोदींनी स्पष्ट केले.

Published on: Aug 01, 2026 10:40 AM

Follow Us