AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत, म्हणाले 'तुम्ही म्हणाले ते मान्य मात्र...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत, म्हणाले ‘तुम्ही म्हणाले ते मान्य मात्र…

| Updated on: Aug 01, 2026 | 12:49 PM
Share

मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरही सूचक भाष्य केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना भाजपला टोला लगावला.

राज ठाकरे म्हणाले की, पंतप्रधानांनी आक्षेपार्ह भाषा आणि व्हिडीओ चुकीचे असल्याचे म्हटले आहे. त्यांचे हे म्हणणे योग्य असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. मात्र, अशाच प्रकारची भाषा वापरणाऱ्या आपल्या पक्षातील लोकांनाही मोदींनी समज द्यावी, असे त्यांनी सांगितले.

“पंतप्रधानांना सांगायचं तुमच्या पक्षातील लोकांनाही सांगा,” असे म्हणत राज ठाकरे यांनी भाजपच्या ट्रोल टीमवर निशाणा साधला. महात्मा गांधी, नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यापासून अनेकांवर ट्रोलिंग होत असल्याचा दावा त्यांनी केला.

मोदींनी संबंधित तरुणांना माफ केल्याचे म्हटले आहे. त्यावर राज ठाकरे यांनी, “पण १२ वर्ष तुमच्या लोकांनी जे केलं त्याची माफी कोण मागणार,” असा सवाल उपस्थित केला. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Published on: Aug 01, 2026 12:46 PM

Follow Us