AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE मेळाव्यात घडलं अनपेक्षित! अमित ठाकरे भरसभेत बोलताना भाषणच विसरले... Video होतोय व्हायरल

LIVE मेळाव्यात घडलं अनपेक्षित! अमित ठाकरे भरसभेत बोलताना भाषणच विसरले… Video होतोय व्हायरल

| Updated on: Aug 01, 2026 | 12:09 PM
Share

मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात मनसे नेते अमित ठाकरे यांच्या भाषणादरम्यान अनपेक्षित घडामोड पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना अमित ठाकरे काही क्षणांसाठी भावूक झाले आणि भाषणाचा धागा सुटल्याने त्यांनी "मी विसरायला लागलो... मला सुचत नाहीये... मी परत येतो," असे सांगत काही वेळासाठी मंच सोडला. या घटनेमुळे सभागृहात उपस्थित मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते काही काळ अवाक् झाले.

मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात मनसे नेते अमित ठाकरे यांच्या भाषणादरम्यान अनपेक्षित घडामोड पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना अमित ठाकरे काही क्षणांसाठी भावूक झाले आणि भाषणाचा धागा सुटल्याने त्यांनी “मी विसरायला लागलो… मला सुचत नाहीये… मी परत येतो,” असे सांगत काही वेळासाठी मंच सोडला. या घटनेमुळे सभागृहात उपस्थित मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते काही काळ अवाक् झाले.

यापूर्वी भाषणाची सुरुवात करताना अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी हलक्या-फुलक्या अंदाजात संवाद साधला. “थोड्या घोषणा द्या म्हणजे माझं भाषण आटपेल,” असे म्हणत त्यांनी वातावरण हलके केले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थी आंदोलनाचा उल्लेख करत, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.

भाषणादरम्यान अमित ठाकरे यांनी आपण राज ठाकरे यांचे पुत्र असल्यामुळेच राजकारणात आल्याची स्पष्ट कबुली दिली. “मी राज साहेबांचा मुलगा नसतो तर राजकारणात नसतो. पण तुमच्यासारखे कार्यकर्ते नसते तर राजकारणात टिकूही शकलो नसतो,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. महाराष्ट्रभर झालेल्या दौऱ्यांचा आणि विद्यार्थी संघटनेच्या कामाचा उल्लेख करत त्यांनी पक्षाच्या वाढीत कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.

देश आणि राज्याच्या सद्यस्थितीवर बोलताना अमित ठाकरे भावूक झाले. “आपण आंदोलने विसरून आता पुढच्या लढाईसाठी तयार झालं पाहिजे,” असे म्हणत असतानाच ते काही क्षणांसाठी थांबले आणि भाषण पुढे सुरू ठेवता आले नाही. त्यामुळे त्यांनी मंच सोडला. सुमारे दहा मिनिटांनंतर ते पुन्हा मंचावर परतले आणि उर्वरित भाषण पूर्ण करत राज्य आणि केंद्र सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार टीका केली.

 

Published on: Aug 01, 2026 12:09 PM

Follow Us