कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गौण खनिजांच्या व्यवस्थापनात डिजिटल क्रांतीची घोषणा केली आहे. महाखनिज 2.0 मुळे आता खनिजांचे निरीक्षण, अहवालनिर्मिती आणि उत्खननावर करडी नजर राहणार आहे. १००% डिजिटल वाहतूक परवान्यामुळे महसूल संकलन अधिक अचूक, पारदर्शक आणि प्रभावी होईल.
महाराष्ट्राच्या गौण खनिजांच्या व्यवस्थापन प्रणालीमध्ये एक महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच या संदर्भात माहिती दिली असून, पारंपरिक प्रक्रिया आता पूर्णपणे आधुनिक आणि डिजिटल झाली आहे. फडणवीस सरकारने घेतलेल्या या डिजिटल क्रांतीच्या निर्णयामुळे गौण खनिजांचे निरीक्षण, अहवालनिर्मिती आणि उत्खननावर आता करडी नजर ठेवणे शक्य होणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे महाखनिज 2.0 हे अधिक प्रगत तंत्रज्ञान आता कार्यान्वित होत आहे.
या नवीन प्रणालीमुळे महसूल संकलन पूर्वीपेक्षा अधिक अचूक, पारदर्शक आणि प्रभावी होणार आहे. महाखनिज 2.0 चे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे १०० टक्के डिजिटल वाहतूक परवाना. यामुळे प्रत्यक्ष कागदी वाहतूक परवान्याची आवश्यकता पूर्णपणे संपुष्टात येईल. याव्यतिरिक्त, खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांची रिअल टाईम ट्रॅकिंग करणे शक्य होणार आहे, ज्यामुळे अवैध वाहतुकीला आळा बसेल आणि संपूर्ण व्यवस्थेत अधिक शिस्त येईल. ही प्रणाली महाराष्ट्रातील खनिज संपत्तीच्या योग्य व्यवस्थापनासाठी एक मैलाचा दगड ठरेल.
Published on: Sep 15, 2026 05:16 PM
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...

