AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंची फटकेबाजी

मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंची फटकेबाजी

| Updated on: Aug 01, 2026 | 12:37 PM
Share

मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील शिक्षण व्यवस्था आणि शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. आपल्या भाषणात त्यांनी उपरोधिक शैलीत शिक्षणमंत्र्यांच्या विधानांचा समाचार घेत राज्य सरकारवर निशाणा साधला.

राज ठाकरे म्हणाले, “आम्ही लहान असताना आमचे आई-वडील रात्री झोपताना डोक्याला तेल लावायला सांगायचे. त्यामुळे बुद्धी तल्लख होते, असं ते म्हणायचे. पण एका माणसाने आयुष्यभर डोक्याला तेल चोपडलं, तरी त्याला बुद्धी आली नाही. प्रत्येक केस स्वतंत्र उमेदवारासारखा उभा असतो. हे म्हणे राज्याचे शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री,” असा टोला त्यांनी लगावला.

यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या काही विधानांचाही उल्लेख करत टीका केली. “दगडावरचे फूटप्रिंट आधारशी लिंक करणार म्हणतात. ते नेमकं कसं शक्य आहे? मला तर चंद्रकांत पाटील यांच्या मेंदूचे फिंगरप्रिंट पाहायचे आहेत,” असे म्हणत त्यांनी शिक्षणमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राज ठाकरे पुढे म्हणाले, “कोल्हापूरकरांनी शिक्षणासाठी त्यांना पुण्यात पाठवलं. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर मानलं जातं. पण तिथेही काही झालं नाही. अशा व्यक्तीला राज्याचा शिक्षणमंत्री म्हटल्यावर आजच्या तरुणांचा आणि जनरेशन-Z चा संताप होणारच. राज्याच्या नशिबी अशी माणसं आली आहेत, ही दुर्दैवाची बाब आहे,” अशी टीका त्यांनी केली.

मनसे विद्यार्थी सेनेच्या मेळाव्यातील या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत असून, राज ठाकरे यांच्या टीकेला सत्ताधारी पक्षाकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

Published on: Aug 01, 2026 12:37 PM

Follow Us