AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Commonwealth Game | कॉमनवेल्थमध्ये भारताची पदकांची आतषबाजी! एका दिवसात 6 पदके, ज्युडोपासून भालाफेकीपर्यंत भारतीय खेळाडूंची कमाल

Commonwealth Game | कॉमनवेल्थमध्ये भारताची पदकांची आतषबाजी! एका दिवसात 6 पदके, ज्युडोपासून भालाफेकीपर्यंत भारतीय खेळाडूंची कमाल

| Updated on: Aug 01, 2026 | 11:13 AM
Share

कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये भारतासाठी 31 जुलै हा दिवस ऐतिहासिक ठरला असून, भारतीय खेळाडूंनी ज्युडो आणि ॲथलेटिक्समध्ये दमदार कामगिरी करत एका दिवसात तब्बल सहा पदकांची कमाई केली आहे. या शानदार प्रदर्शनामुळे भारताच्या एकूण पदकांची संख्या 23 वर पोहोचली असून, त्यामध्ये 5 सुवर्ण, 12 रौप्य आणि 6 कांस्य पदकांचा समावेश आहे. मात्र, एकूण पदकतालिकेत भारत सध्या 10व्या स्थानावर असून, 24 पदकांसह वेल्स नवव्या स्थानावर आहे.

नवव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य पदके जिंकत देशाची मान उंचावली. ज्युडोमध्ये महिलांच्या 48 किलो गटात अस्मिता डे हिने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले, तर पुरुषांच्या 60 किलो गटात हर्ष सिंहने 10-0 अशा एकतर्फी विजयासह सुवर्णपदक पटकावले. महिलांच्या 57 किलो गटात यामिनी मौर्यने रौप्य पदक जिंकले.

भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असलेल्या नीरज चोप्राला 85.83 मीटरच्या सर्वोत्तम फेकीसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. मात्र, यशवीर सिंहने 85.41 मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह कांस्य पदक पटकावत सर्वांचे लक्ष वेधले. तसेच तेजस्विन शंकरने डेकॅथलॉनमध्ये कांस्य पदक जिंकत या स्पर्धेत पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला.

दरम्यान, बॉक्सिंगमध्येही भारताची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. भारतीय संघातील सर्व 10 उपांत्य फेरीतील बॉक्सरांनी आपापले सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला असून, किमान रौप्य पदक निश्चित केले आहे. त्यामुळे आगामी दिवसांत भारताच्या सुवर्णपदकांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये आतापर्यंत भारतासाठी मीराबाई चानू, शर्मिला धनकड, दिलीप गावित, अस्मिता डे आणि हर्ष सिंह यांनी सुवर्णपदके जिंकली आहेत. तर नीरज चोप्रासह अनेक खेळाडूंनी रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई करत भारताची पदकांची झोळी भरली आहे. भारतीय खेळाडूंच्या या दमदार प्रदर्शनामुळे आगामी स्पर्धांबाबत देशाच्या अपेक्षा अधिक उंचावल्या आहेत.

Published on: Aug 01, 2026 11:13 AM

Follow Us