Sanjay raut UNCUT | एकतर गृहमंत्र्यांसारखे या, नाही तर गुंड्यांसारखे या, तुम्ही…’ संजय राऊतांचं अमित शाहांबाबत खळबळजनक विधान
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवरून सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी लोकमान्य टिळकांच्या कुटुंबावरही जोरदार टीका केली. टिळकांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचा संदर्भ देत त्यांनी शिंदे गटावरही आरोप केले. इतकेच नाही तर त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही थेट निशाणा साधला आहे.

दरम्यान, गृहमंत्री येणार असल्याने पुण्यात आर्मी आणि महाराष्ट्राचा पोलीस फोर्स आणल्याचा दावा राऊत यांनी केला. यावरून त्यांनी सरकारला सवाल केला. “तुम्ही कशाला घाबरता? तुम्ही मूळचे गुंड आहात. तुम्ही एक तर गुंडासारखे वागा किंवा गृहमंत्र्यासारखे वागा,” असं ते म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, “काय झालं काय टिळकांच्या कुटुंबाला? शिंदेंच्या गटात टिळकांचं कुटुंब गेलं. लाज वाटली पाहिजे.” स्वाभिमानासाठी टिळकांच्या पूर्वजांनी दिलेल्या लढ्याची आठवण करून देत त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचाही उल्लेख केला. “जालियनवालानंतरचं हे कांड आहे,” असा आरोप त्यांनी केला.
Published on: Aug 01, 2026 11:44 AM
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...