Photo : पठ्ठ्याचा नाद खुळा! 10 वर्षांपासून खातोय फक्त झाडांचा पाला, हैराण करणारं कारण

Unique Man Belgaon Tarzan : मानवाला जगण्यासाठी अन्नाची गरज असते, मात्र बेळगावमधील एक तरूण अन्नाचा त्याग करून केवळ झाडांचा पाला खाऊन जगत आहे. यामागे एक हैराण करणारे कारण आहे.

बापू गायकवाड | Updated on: Feb 11, 2026 | 8:02 PM
1 / 5
बेळगाव जिल्ह्यातील एका तरुणाने गेल्या दहा वर्षांपासून अन्नाचा त्याग करून केवळ झाडांचा पाला खाऊन जगण्याचा विस्मयकारक मार्ग स्वीकारला आहे. डोंगरावर राहून प्राण्यांप्रमाणे जीवन जगणाऱ्या या 'आधुनिक टार्जन'ची ही जीवनशैली सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

2 / 5

सौदत्ती तालुक्यातील उगरगोळ गावातील बुडन खान होसमनी (34) या तरुणाने वैद्यकीय विश्वापुढे मोठे कोडे उभे केले आहे. गेल्या दहा वर्षांपासून त्याने अन्नाकडे पाठ फिरवली असून, तो केवळ झाडांचा पाला खाऊन जगत आहे.

3 / 5

गावाबाहेरील हेग्गोळ नावाच्या डोंगराळ भागात तो एकांतात राहतो. झाडांचा पाला खाऊनही त्याची प्रकृती उत्तम असल्याने स्थानिक नागरिक त्याला 'आधुनिक टार्जन' म्हणून ओळखतात.

4 / 5

दहा वर्षांपूर्वी लग्नासाठी घरच्यांनी तगादा लावल्याने बुडन खानने घर सोडून डोंगराचा आश्रय घेतला होता. तेथे वानरांना झाडांचा पाला खाताना पाहून त्यानेही हीच सवय लावून घेतली.

5 / 5

दररोज सकाळी झाडांचा पाला खाल्ल्यानंतर त्याचे पचन व्हावे म्हणून तो कठीण योगासने करतो. भूक लागली की वानरांप्रमाणे झाडावर चढून पाला खाणाऱ्या बुडन खानचे हे अजब वागणे सध्या सर्वांच्या कुतुहलाचा विषय ठरले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us