लता मंगेशकरांच्या 59 वर्ष जुन्या गाण्यादरम्यान झाला मोठा राडा! दिग्दर्शकांचा पारा चढला अन् अभिनेत्रीने फक्त 15 मिनिटांच्या सरावानंतर…
1967 मध्ये प्रदर्शित झालेल्या ज्वेल थीफ चित्रपटातील एक गाणे आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. वैजयंतीमाला यांच्या नृत्याने सजलेल्या या गाण्याच्या शूटिंगशी संबंधित एक खास किस्सा आहे. अवघ्या 15 मिनिटांच्या सरावानंतर त्यांनी कॅमेऱ्यासमोर अप्रतिम नृत्य सादर केले होते.

1967 मध्ये प्रदर्शित झालेल्या ज्वेल थीफ चित्रपटातील 'होंठों में ऐसी बात' हे गाणे आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. वैजयंतीमाला यांच्या नृत्याने सजलेल्या या गाण्याच्या शूटिंगशी संबंधित एक खास किस्सा आहे. अवघ्या 15 मिनिटांच्या सरावानंतर त्यांनी कॅमेऱ्यासमोर अप्रतिम नृत्य सादर केले होते.
या गाण्यात वैजयंतीमाला यांनी आपल्या नृत्यकौशल्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधले. त्यांच्या अदाकारीमुळे हे गाणे आजही लोकप्रिय आहे. शाळा, कॉलेज आणि विविध कार्यक्रमांमध्ये या गाण्यावर नृत्य सादर केले जाते. चित्रपटाचे दिग्दर्शक विजय आनंद यांना गाण्यासाठी अधिक सराव व्हावा असे वाटत होते. मात्र, वैजयंतीमाला यांनी फार वेळ रिहर्सल केली नाही. त्यांनी केवळ 15 मिनिटे सराव केला.
या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन सोहनलाल यांनी केले होते. त्यावेळी सरोज खान त्यांच्या सहाय्यक म्हणून काम करत होत्या. वैजयंतीमाला यांना नृत्याचा सराव करून देण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती.
या गाण्याचा समावेश चित्रपटाच्या क्लायमॅक्सच्या आधी करण्यात आला होता. गंगटोकमधील एका शाही सोहळ्यातील नृत्यप्रसंगातून चित्रपटातील रहस्य पुढे सरकते.आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे त्याकाळी या गाण्यला काहींनी डबल मिनिंग असल्याचं सांगत विरोधही केला होता.
या गाण्यात देव आनंद आणि इतर नृत्यकलाकारही दिसले होते. अनेक वर्षांनंतरही हे गाणे जुन्या हिंदी चित्रपटांमधील लोकप्रिय डान्स नंबर म्हणून ओळखले जाते.