अखेर मी वाचवा… वाचवा… ओरडू लागले; वर्षा उसगांवकरांनी सांगितला धक्कादायक किस्सा, आजही…
अभिनेत्री वर्षा उसगांवकर या त्यांच्या आयुष्यातील बऱ्यावाईट क्षणांविषयी चाहत्यांना सांगतच असतात. अलीकडेच त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से, घटनांचा उलगडा केला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत घोड्यासोबत शुटींगचा किस्सा सांगितला, यावेळी त्या खूप घाबऱ्याल होत्या असं देखील त्यांनी सांगितलं.

गोव्यात जन्मलेल्या वर्षा उसगांवकर यांनी कॉमर्स या शाखेत पदवी घेतली, नंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. इतकेच नाही तर यासाठी खास दोन वर्षे नाट्यशास्त्राचे शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबईत आल्या आणि व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी अभिनयाला सुरुवात केली.
वर्षा उसगांवकर म्हणाल्या, मला सांगण्यात आलं की ही कार नाही, घोडा आहे आणि त्याला स्वतःचं डोकं आहे. तो तुला कुठेही नेऊ शकतो आणि मी घाबरले.
शूटिंग दरम्यानचा किस्सा सांगताना वर्षा उसगांवकर पुढे म्हणाल्या, असंच घडलं... मला घोड्याने कुठेतरी नेलं, त्यावेळी मी दोन-चार वेळा पडले, थेट नाकावरच पडले...
त्यांनी आणखी एक किस्सा सांगितला की, घोडा एकदा मला समुद्रात घेऊन चालला होता, कुत्र्यांमुळे घोडे बिथरतात, मी लगाम खेचत होते, तो घाबरत होता, मी घाबरत होते; अखेर मी वाचवा... वाचवा... ओरडू लागले आणि शेवटी कशीबशी वाचले.
हा अनुभव सांगितल्यानंतर त्या म्हणाल्या, मी आजही घोड्यावर बसायला घाबरते... कारण या वयात हाडं मोडली म्हणजे झालं...