
1 - बंगळुरुतील स्काय-व्हीलात ओपन स्वीमींग पूल, प्रायव्हेट हेलीपॅड, 360 डिग्री व्यू आणि तमाम लक्झरी सुविधांची रेलचेल आहे. हा बंगला कधी काळी भारताचे मद्यसम्राट म्हटले जाणाऱ्या आणि सध्या लंडनला परांगदा झालेल्या विजय माल्या यांचे स्वप्न होता.

2 - एकूण 4.5 एकरात पसरलेल्या किंगफिशर टॉवर्समध्ये एकूण 33 फ्लोअर आणि 81 अपार्टमेंट आहेत.याच्या सर्वात वरच्या मजल्यावर विजय माल्या याने स्वत:चे हे सफेद रंगाचे पेंटहाऊस बांधले आहे. याचा पसाराच जवळपास 40,000 वर्ग फीट पसरला आहे. विजय माल्याने स्वत:च्या गरजेनुरुप यास डिझाईन केले होते.

3 - या हवा महलमध्ये विजय माल्या यांचा खाजगी लिफ्ट, पर्सनल लॉबी आणि होम ऑफिस देखील आहे. परंतू नियतीची विचित्र विडंबना ही की विजय माल्या यांना या घरात कधी मुक्काम करण्याची संधीच मिळाली नाही असे म्हटले जाते.

4- ‘किंग ऑफ गुड टाईम्स’म्हटले जाणारे विजय माल्या यांनी या बंगल्यात मोठ्या फुरसती एक एक गोष्टी डिझाईन केल्या होत्या. या हवा महलला बनविणारी कंपनी प्रेस्टीज एस्टेट्स प्रोजेक्ट्सचे चेयरमैन इरफान रझाक यांच्या मते या 33 मजली इमारतीच्या वरती इतक्या उंचीवर एवढे मोठे पेंटहाऊस बनविणे मोठे आव्हानाचे काम होते.

5 -या आलिशान टॉवरमध्ये देशाचे अनेक दिग्गज व्यावसायिक रहात होते. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती, लेखिका सुधा मूर्ती, जेरोधाचे निखिल कामत आणि बायोकॉनच्या किरण मजूमदार शॉ सारखे उद्योगपतींनी येथे फ्लॅट खरेदी केले आहेत. प्रत्येक अपार्टमेंट सुमारे 8000 चौरस फूटाचे आहे. त्याची सुरुवातीची किंमतच 20 कोटी रुपयांपासून सुरु होते.

6 - या पेंटहाऊस अंदाजे किंमत सुमारे 20 मिलियन डॉलर म्हणजे, सुमारे 170 कोटी रुपये आहे. परंतू विजय माल्या याला यात रहाण्याची संधीच मिळाली नाही. कारण बँक कर्ज बुडवल्याच्या प्रकरणात अडकल्यानंतर विजय माल्या देशातून पसार झाले. आणि लंडनला स्थायिक झाले.तेथे ते त्यांचा मुलगा आणि सुनेसोबत अन्य एका बंगल्यात रहात आहेत.