Akshay Kumar : आधीच्या आणि आताच्या रवीना टंडनमध्ये तुला काय फरक दिसतो? या प्रश्नावर अक्षय कुमारने लगेच उत्तर दिलं की..

Akshay Kumar : वेलकम टू द जंगलचा ट्रेलर रिलीज झाला आहे. लॉन्च इवेंटमध्ये स्टारकास्ट बरोबर बरीच चर्चा झाली. हाच प्रश्नोत्तरांचा सिलसिला सुरु असताना एका सेशनमध्ये अक्षय कुमारला रवीना टंडन बद्दल प्रश्न विचारण्यात आला.

| Updated on: Jun 11, 2026 | 2:39 PM
1 / 5
त्यावेळच्या आणि आजच्या रवीना टंडनमध्ये काय फरक आहे?. त्यावर अक्षय कुमार गमतीने बोलला. त्यावेळी ती हिरॉइन होती आणि आता हिरॉइनची आई. अक्षय रवीना टंडन बद्दल एवढच बोलला नाही. त्याने अभिनेत्रीच्या प्रोफेशनलिज्मचं सुद्धा कौतुक केलं.

त्यावेळच्या आणि आजच्या रवीना टंडनमध्ये काय फरक आहे?. त्यावर अक्षय कुमार गमतीने बोलला. त्यावेळी ती हिरॉइन होती आणि आता हिरॉइनची आई. अक्षय रवीना टंडन बद्दल एवढच बोलला नाही. त्याने अभिनेत्रीच्या प्रोफेशनलिज्मचं सुद्धा कौतुक केलं.

2 / 5

90 च्या दशकात अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचं अफेअर भरपूर गाजलेलं. दोघे लग्न करणार होते. पण त्यांचं ब्रेक-अप झालं. आजही मीडियामध्ये त्यांच्या लव्ह अफेअरची भरपूर चर्चा होते.

3 / 5

ट्रेलर लॉन्चच्यावेळी अक्षय कुमारला विचारण्यात आलं की, याआधी सुद्धा तू रवीनासोबत काम केलं आहेस. आता इतक्या वर्षानंतर तुम्ही पुन्हा एकत्र येताय. त्यावेळच्या आता आणि आत्ताच्या रवीनामध्ये काय फरक आहे.

4 / 5

रवीनाचं कौतुक करताना अक्षय कुमार बोलला की, ती खूप मेहनती आणि प्रोफेशनल आहे. एक जुना किस्सा सांगताना अक्षय कुमार म्हणाला की, एकदा शूटिंग सुरु असताना सनलाइट संपणार होती. सूर्यास्त व्हायला 20 ते 25 मिनिटं बाकी होती.

5 / 5

ग्रीम रुम लांब होता. रवीनाला एक सीनसाठी ड्रेस चेंज करावा लागणार होता. हे थोडं अशक्य वाटत होतं. पण ती जनरेटर रुममध्ये गेली आणि लगेच ड्रेस चेंज करुन आली. आम्ही तो सीन लगेच पूर्ण केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us