कोण आहेत IFS सिद्धार्थ बाबू? PM मोदी, पुतिन अन् जिनपिंग यांच्यासोबतचा फोटो व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी, पुतिन आणि शी जिनपिंग यांच्यासोबत एका अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल होत आहे. सिद्धार्थ बाबू हे केरळचे रहिवासी असून IFS अधिकारी आहेत.

| Updated on: Sep 13, 2026 | 8:04 PM
1 / 5
दिल्लीत झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेला रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांनी हजेरी लावली. या ब्रिक्स शिखर परिषदेतील एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दिल्लीत झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेला रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांनी हजेरी लावली. या ब्रिक्स शिखर परिषदेतील एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

2 / 5

दिल्लीतील या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन, शी. जिनपिंग यांच्यासोबत एका तरुण IFS अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल होत आहे. सिद्धार्थ बाबू असे IFS अधिकाऱ्याचे नाव असून ते 36 वर्षांचे आहेत.

3 / 5

सिद्धार्थ हे भारतीय परराष्ट्र सेवेत अधिकारी आहेत. सिद्धार्थ बाबू ह चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचं बोलणं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करत होते. केरळमधील कोचीचे रहिवासी असलेले सिद्धार्थ बाबू यांनी 2012 साली मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवली. काही काळ त्यांनी ई-कॉमर्स क्षेत्रातही काम केलं आहे.

4 / 5

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा चांगला अभ्यास असल्याने त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. पहिल्या प्रयत्नात अपयश आलं. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवलं.

5 / 5

सिद्धार्थ बाबू हे 2017 च्या बॅचचे आयएफएस अधिकारी आहेत. त्यांनी 2018 ते 2022 या कालावधित बिजिंगमध्ये भारतीय दूतावास म्हणून सेवा बजावली. त्यांचं चिनी भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us