AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमध्ये हे काय झालं? दुसऱ्या पसंतीची मतमोजणीत चित्र पलटलं… सुधाकर कोहळेंना विश्वासच बसेना

Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमधील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे सुधाकर कोहळे यांचा पराभव झाला असून काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांचा विजय झाला आहे.

Nagpur MLC Election Result 2026: नागपूरमध्ये हे काय झालं? दुसऱ्या पसंतीची मतमोजणीत चित्र पलटलं... सुधाकर कोहळेंना विश्वासच बसेना
Sudhakar KohaleImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 29, 2026 | 7:59 AM
Share

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. 3 पदवीधर आणि 2 शिक्षण मतदारसंघाच्या जागांपैकी तीन जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. दोन जागांवर महायुती सरस ठरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरमध्येदेखील महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. नागपूरमधील काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी भाजपचे सुधाकर कोहळे यांचा पराभव केला आहे.

निकाल समोर येत असताना सुधाकर कोहळे यांचा विश्वासच बसत नव्हता. काँग्रेसने जल्लोष सुरु केला असला तरी आम्ही पराभव मान्य केलेला नाही. अजूनही 36 वी बाद फेरी सुरु आहे. या फेरीपर्यंत मी तीन हजार मतांनी आघाडीवर आहे. भाजपाची 9 हजार मतं बाद झाली. त्यातच आम्ही मागे पडलो. ज्या भाजपच्या मतदारांनी माझ्या पसंतीक्रमासमोर एक न लिहता 2 लिहिले यांना माझी विनंती आहे लोकशाहीसाठी असे मतदान करणे योग्य नाही. संपूर्ण मतमोजणी झाल्याशिवाय आम्हाला पराभव मान्य नसल्याचे सुधाकर कोहळे यांनी म्हटले.

नागपूर पदवीधर मतदारसंघातील मतमोजणी ही अलीकडच्या काळातील सर्वात रोमांचक आणि नाट्यमय घटना ठरली. मतमोजणी सुरू झाल्यापासूनच मतदारसंघात उत्कंठा वाढली होती. पहिल्या फेरीत काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी आघाडीवर होते. मात्र दुसऱ्या फेरीतच चित्र बदलले आणि भाजपचे सुधाकर कोहळे यांनी जवळपास चार हजार मतांची मोठी आघाडी घेतली. बुधवारी संध्याकाळपर्यंत ही आघाडी कायम राहिल्याने बहुतांश लोकांना भाजपचा विजय निश्चित वाटू लागला होता.

रात्री नितेश कराळे यांच्या मतपत्रिकांवरील दुसऱ्या प्राधान्यक्रमाच्या मतांची मोजणी सुरू होताच मात्र संपूर्ण परिस्थिती पालटली. अभिजीत वंजारी यांची आघाडी झपाट्याने वाढू लागली आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. या सर्वांवर सुधाकर कोहळे यांनी विश्वास ठेवण्यास नकार दिला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “काँग्रेसने जल्लोष सुरू केला असला तरी आम्ही पराभव मान्य केलेला नाही. अजूनही ३६ वी बाद फेरी सुरू आहे. या फेरीपर्यंत मी तीन हजार मतांनी आघाडीवर आहे. भाजपाची सुमारे नऊ हजार मते बाद झाली. त्यामुळे आम्ही मागे पडलो. ज्या भाजपच्या मतदारांनी माझ्या पसंतीक्रमासमोर ‘१’ न लिहिता ‘२’ लिहिले, त्यांना मी विनंती करतो की लोकशाहीसाठी असे मतदान योग्य नाही. संपूर्ण मतमोजणी संपेपर्यंत आम्ही पराभव मान्य करणार नाही.”

पहिल्या पसंतीच्या दोन फेऱ्यांमध्ये 1 लाख 65 हजार 906 मतांपैकी 15 हजार32 मते अवैध ठरली. तर 1 लाख 50 हजार 874 मते वैध ठरली. द्वितीय पसंतीच्या बाद फेऱ्यामध्येही कुठल्याही उमेदवाराला निर्धारित कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे पहिल्या व द्वितीय पसंतीक्रमाच्या बाद फेरी मिळून सर्वाधिक 67 हजार 231 मते घेणाऱ्या अभिजित वंजारी यांना विजयी घोषित करण्यात आले.

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान