AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! स्टेशन मास्टरच्या 1265 पदांसाठी भरती सुरू; अर्जाची शेवटची तारिख आणि पात्रता काय?

भारतीय रेल्वेत सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) स्टेशन मास्टरच्या 1265 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयो मर्यादा, अर्ज शुल्क आणि निवड प्रक्रिया यांसारख्या तपशीलांसाठी अधिकृत अधिसूचना तपासावी.

रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! स्टेशन मास्टरच्या 1265 पदांसाठी भरती सुरू; अर्जाची शेवटची तारिख आणि पात्रता काय?
| Edited By: | Updated on: Oct 29, 2026 | 7:55 AM
Share

RRB Station Master Recruitment 2026: भारतीय रेल्वेत सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) स्टेशन मास्टरच्या 1265 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, वयो मर्यादा, अर्ज शुल्क आणि निवड प्रक्रिया यांसारख्या तपशीलांसाठी अधिकृत अधिसूचना तपासावी.

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वे भरती मंडळाने (RRB) स्टेशन मास्टरच्या एकूण 1265 रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 27 ऑक्टोबर 2026 पासून सुरू झाली आहे. विशेष म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना 25 नोव्हेंबर 2026 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. जाणून घेऊया या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क आणि अर्ज करण्याची पद्धत.

किती पदांसाठी होणार भरती?

रेल्वे भरती मंडळाच्या CEN 08/2026 अधिसूचनेनुसार देशभरात स्टेशन मास्टरच्या एकूण 1265 पदांसाठी भरती केली जाणार आहे. यामध्ये मुंबई रेल्वे भरती मंडळात सर्वाधिक 177 पदे आहेत. त्यानंतर जम्मू-श्रीनगरमध्ये 122 आणि चेन्नईमध्ये 119 पदे आहेत.

कशी असेल निवड प्रक्रिया?

स्टेशन मास्टर पदासाठी उमेदवारांना सर्वप्रथम संगणक आधारित परीक्षा (CBT), कंप्यूटर आधारित एप्टीट्यूड टेस्ट (CBAT) घेतली जाईल. त्यानंतर डॉक्यूमेंट वेरिफिकेशन आणि मेडिकल परीक्षा घेतली जाईल. उपलब्ध भरती तपशीलांनुसार, स्टेशन मास्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे पदवीधर असणे अनिवार्य आहे.

अर्ज करण्याची पद्धत

– सर्वप्रथम रेल्वे भरती मंडळाच्य rrbapply.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा. – होमपेजवरील भरती (recruitment) लिंक उघडा. – त्यानंतर, लॉग इन करा आणि अर्ज (application form) मिळवा. – अर्जामध्ये सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. – तुमचे परीक्षा शहर निवडा. – त्यानंतर शुल्क भरा – शेवटी अर्जातील सर्व माहिती तपासून तुमचा अर्ज सबमिट करा.

किती शुल्क भरावे लागणार?

या भरतीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना 250 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. नोंदणी शुल्क भरण्याची अंतिम तारीख 27 नोव्हेंबर 2026 आहे.

किती मिळणार पगार?

स्टेशन मास्टर पदावर नोकरी मिळाल्यानंतर पे लेव्हल-6 नुसार वेतन दिले जाते. यामध्ये दरमहा 35400 रुपये मूळ वेतन आणि 4200 रुपये ग्रेड पे मिळतो. याशिवाय कर्मचाऱ्यांना इतर विविध भत्ते आणि सुविधांचाही लाभ मिळतो.

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान