AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar : Google ला देखील माहिती नाही नाना पाटेकरांचं गुप्त मिशन, निधनानंतर मोठी माहिती समोर

Nana Patekar : दिवंगत अभिनेते 'नाम' फाउंडेशनच्या माध्यमातून गरजूंची मदत करायचे याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. पण नाना पाटेकर यांनी अनेक कार्य असे देखील केले आहेत, त्याबद्दल कोणालाच माहिती नाही. एवढंच नाही तर, गुगलवर देखील त्याबद्दल काहीच नाही...

Nana Patekar : Google ला देखील माहिती नाही नाना पाटेकरांचं गुप्त मिशन, निधनानंतर मोठी माहिती समोर
Nana Patekar
| Updated on: Oct 29, 2026 | 8:29 AM
Share

Nana Patekar : दिवंगत अभिनेते नाना पाटेकर यांनी मराठी आणि हिंदी सिनेविश्वात एक काळ गाजवला आहे. एकीकडे नाना पाटेकर यांनी अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं, तर दुसरीकडे अनेक गरजूंच्या मदतीसाठी देखील नाना पाटेकरल धावत आले. ‘नाम’ फाउंडेशनच्या वतीने नाना पाटेकर यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये जलसंधारणाचं केलेलं कार्य आज संपूर्ण जगाला माहिती आहे. पण नानांच्या भावना फक्त शेतकऱ्यांपर्यंत मर्यादित नव्हत्या, त्यांची सहानुभूती अशा सीमावर्ती आणि दुर्गम भागांपर्यंत पोहोचली होती, जिथे सामान्य लोकांचं लक्ष कधी गेलचं नाही.

सांगायचं झालं तर, नानांचे खास मित्र आणि मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी एका मुलाखतीत नाना पाटेकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्यांच्या अशा दोन ‘गुप्त व न ऐकलेल्या मिशन’चा खुलासा केला आहे, जे इंटरनेट किंवा गुगल सर्चवरही कुठेही नोंदवले गेलेले नाहीत. जेव्हा जेव्हा देशात भीषण पूर, वादळ किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती येते, तेव्हा एनडीआरएफचे (NDRF) जवान स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना वाचवण्यासाठी पोहोचतात.

संपूर्ण देश पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावतो, पण नाना पाटेकर यांचं लक्ष अशा गोष्टीकडे गेलं, ज्याकडे प्रत्येकजण दुर्लक्ष करतो. नाना पाटेकर यांनी एकदा त्यांच्या टीमला प्रश्न विचारला होता, “जेव्हा संपूर्ण गाव किंवा शहर पाण्याखाली जातं, घरं बुडालेली असतात, तेव्हा तिथे रेस्क्यू करण्यासाठी पोहोचलेल्या 50-60 जवानांच्या जेवणाची आणि विश्रांतीची व्यवस्था कुठे होते? ज्यांचं सर्व काही वाहून गेलं आहे, अशा लोकांकडे तुम्ही चहा-पाण्याची मागणी करू शकता का?”

NDRF च्या जवानांसाठी खास व्यवस्था…

जवानांची महत्त्वाची समस्या सोडवण्यासाठी नाना पाटेकर यांनी तात्काळ मोठं पाऊल उचललं आणि NDRF जवानांसाठी 5 विशेष गाड्या म्हणजेच व्हॅन तयार केल्या. या गाड्यामध्ये 50 जवानांसाठी जेवण बनवण्यासाठी (मोबाईल किचन) आणि काम झाल्यानंतर आराम करण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली. आता जेव्हा कोणतीही समस्या येते, तेव्हा या गाड्या जवानांसाठी पाठवल्या जातात.

काश्मीरचे गुप्त मिशन

खूप कमी लोकांना माहीत आहे की नाना पाटेकर यांनी 2021 मध्ये त्यांच्या आईच्या (माई) नावाने ‘निर्मला गजानन फाउंडेशन’ची स्थापना केली होती. भारतीय सैन्याबद्दल नानांचं असलेलं प्रेम आणि आदर प्रत्येकाला माहीतच आहे. याच प्रेमापोटी त्यांनी भारतीय सैन्याच्या मदतीने जम्मू-काश्मीरमध्ये शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात एक शांत क्रांती सुरू केली.

43 शाळा दत्तक घेतल्या: खोऱ्यातील मुलांना देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी आणि त्यांच्यात देशप्रेमाची भावना निर्माण करण्यासाठी नानांच्या फाउंडेशनने काश्मीरमधील 43 शाळा दत्तक घेतल्या.

72 मुलांची शस्त्रक्रिया: काश्मीरमधील 72 मूक-बधिर मुलांच्या कानांची शस्त्रक्रिया करून घेतली आणि त्यांच्या संपूर्ण उपचारांची जबाबदारी सांभाळली.

शहीद कुटुंबांसाठी वॉटर एटीएम: लेह-लडाख आणि काश्मीरमध्ये शहीद जवानांच्या पत्नींना कायमस्वरूपी उत्पन्नाचं साधन मिळवून देण्यासाठी अनेक वॉटर एटीएम उभारले. मकरंद अनासपुरे यांनी सांगितले की, नानांचे हे काश्मीर मिशन आता त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर पुढे नेत आहे.

समस्येनंतर नाही, समस्येपूर्वी काम करा – नाना पाटेकर

मकरंद यांनी सांगितले की, नाना पाटेकर यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते कधीही पारंपारिक पद्धतीने विचार करत नसत. जेव्हा चिपळूणमध्ये भीषण पूर आला आणि लोक मदत साहित्य पाठवत होते, तेव्हा नानांनी त्यांच्या टीमला खडसावत म्हटलं होतं की, तुम्ही लोक पूर आल्यानंतरची मदत पाठवत आहात, पण पूर येऊच नये, असं काम का करत नाही? यानंतर ‘नाम’ फाउंडेशनच्या माध्यमातून वशिष्टी, काळ, गौतमी आणि गोदवली यांसारख्या कोकणातील प्रमुख नद्यांचं रुंदीकरण-खोलीकरण आणि गाळ काढण्याचं ऐतिहासिक काम करण्यात आलं. अशी अनेक उत्तम कामं नाना पाटेकर यांनी केली आहेत.

Follow Us
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून
राज ठाकरेंचा महाराष्ट्राला गंभीर इशारा: 50 खोके एकदम ok घोषणेवर सडकून टीका
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान