ब्राझिलियन मॉडेलनंतर आता उर्मीची चर्चा, पुण्यातील महिलेवर काँग्रेसचा गंभीर आरोप

Who is Urrmi: विरोधक मतचोरीबाबत आवाज उठवत आहेत. हरियाणा विधानसभा निवडणुकीदरम्यान एका ब्राझिलियन महिलेचा फोटो २२ वेळा वापरण्यात आला होता असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला होता. आता काँग्रेसने पुण्यातील उर्मी नावाच्या एका महिलेवर गंभीर आरोप केला आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Nov 07, 2025 | 7:19 PM
1 / 5
ब्राझिलियन मॉडेलनंतर आता उर्मीची चर्चा, पुण्यातील महिलेवर काँग्रेसचा गंभीर आरोप

2 / 5
उर्मी ही पुण्यातील वकील असून ती एक सोशल मीडिया इन्फुएंसर देखील आहे. तीने X प्रोफाईलवर आपले वर्णन एक व्हॉइस-ओव्हर आर्टिस्ट असेही केले आहे. मात्र तिच्यावर आता गंभीर आरोप होत आहेत.

3 / 5
काँग्रेसने दावा केला की उर्माने पूर्वी महाराष्ट्रात मतदान केले होते आणि आता बिहारमध्येही मतदान केले आहे. यामुळे संपूर्ण देशात उर्मी नावाच्या महिलेची चर्चा सुरु झाली आहे.

4 / 5
काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या आरजेडीच्या प्रवक्त्या प्रियांका भारती यांनी म्हटले की, 'मॅडमने 2024 मध्ये महाराष्ट्रात आणि 2025 मध्ये बिहारमध्ये मतदान केले! हे लोक उघडपणे व्यवस्था त्यांच्या खिशात घेऊन फिरत आहेत.

5 / 5
फोटो व्हायरल झाल्यानंतर उर्मीने स्पष्टीकरण देताना म्हटले की, मी बिहारमध्ये मतदान केले नाही. माझी पोस्ट केवळ बिहारच्या मतदारांना प्रेरित करण्यासाठी होती. मी म्हणाले 'I voted', पण मी आज मतदान केले असे म्हटले नाही. सर्वांना माहित आहे की मी महाराष्ट्रात मतदान केले.