रिक्षाला 3 चाकं का असतात बरं? 99 टक्के लोकांनाही माहिती नाही नेमकी फॅक्ट; वाचा कारण काय?

ऑटो रिक्षा ही शहरातील सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी महत्त्वाची वाहतूक सेवा आहे. आपल्याला अनेक वेळा दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या वाहनांबाबत तसेच वस्तूंबाबत काही प्रश्न पडतात. अशातच अनेकांना पडणारा प्रश्नन म्हणजे रिक्षेला चारऐवजी तीनच चाकं का असतात? यामागे काही खास कारणं आहेत. जाणून घेऊया.

| Updated on: Oct 03, 2026 | 6:19 PM
1 / 5
रिक्षाची रचना अरुंद आणि गर्दीच्या रस्त्यांचा विचार करून करण्यात आलेली आहे. तीन चाकांमुळे रिक्षेला कमी जागेत सहज वळता येते. त्यामुळे छोट्या गल्ल्यांमध्ये किंवा गर्दीच्या भागातही चालकाला रिक्षा हाताळणे अगदी सोपे जाते.

रिक्षाची रचना अरुंद आणि गर्दीच्या रस्त्यांचा विचार करून करण्यात आलेली आहे. तीन चाकांमुळे रिक्षेला कमी जागेत सहज वळता येते. त्यामुळे छोट्या गल्ल्यांमध्ये किंवा गर्दीच्या भागातही चालकाला रिक्षा हाताळणे अगदी सोपे जाते.

2 / 5

तीन चाकी वाहन तयार करण्यासाठी चार चाकी वाहनांच्या तुलनेत कमी साहित्य लागते. त्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी होतो, वाहनाची किंमतही तुलनेने कमी राहते. टायर, ब्रेक आणि इतर भागांच्या देखभालीवर होणारा खर्चदेखील कमी असतो

3 / 5

रिक्षाचे वजन चार चाकी वाहनापेक्षा कमी असल्याने गाडीच्या इंजिनवर तुलनेने कमी भार पडतो. त्यामुळे इंधनाचा वापर कमी होण्यास मदत होऊ शकते. रोज रिक्षा चालवणाऱ्या चालकांसाठी ही बाब आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची ठरते.

4 / 5

रिक्षाचा आकार काहीसा लहान असल्यामुळे गर्दीच्या रस्त्यांवरून जाणे तुलनेने सोपे होते. कमी जागेतून मार्ग काढता येत असल्याने शहरातील प्रवासासाठी ऑटो-रिक्षा उपयुक्त ठरते. तसेच सामान्य नागरिकांसाठी रिक्षा हा इतर वाहनांच्या तुलनेने परवडणारा पर्याय आहे.

5 / 5

तीन चाकी रिक्षेला अनेक फायदे असले तरी चार चाकी वाहनांच्या तुलनेत तिची स्थिरता काही प्रमाणात कमी असते. वेगात अचानक वळण घेतल्यास वाहनाचा तोल जाण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे रिक्षा सुरक्षित वेगात आणि काळजीपूर्वक चालवणे खूप महत्त्वाचे आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us