Wine Vs Whisky: व्हिस्की बर्फ घालून प्यायली जाते, तर वाइनच्या बाबत तसं का नाही? जाणून घ्या कारण

दारू पिण्याची प्रत्येकाची सवय असते. तो त्या पद्धतीने पित असतो. कोणी नशेसाठी, तर कोणी कधीतरी पित असतो. तसं पाहीलं तर दारू पिणं चुकीचं आहे. व्हिस्की पिणारे लोकं त्यात बर्फ टाकून पितात. पण वाइन तशी प्यायली जात नाही. पण व्हिस्की आणि वाइन यात बर्फाबाबत काय फरक आहे ते तज्ज्ञांकडून समजून घ्या.

| Updated on: Aug 01, 2025 | 8:43 PM
1 / 5
अल्कोहलचं कोणत्याही स्वरूपात घेणं आरोग्यासाठी चांगलं नाही. पण असं असूनही अनेक जण दारूचं सेवन करतात. काही व्हिस्कीत बर्फ टाकून पितात. पण वाइनच्या बाबतीत तसं करत नाहीत. असं का करत असावेत असा प्रश्न पडतो. या दोन्हींमध्ये फरक आहे. ते बनवण्याची प्रक्रिया वेगळी आहे. यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा वापर केला जातो. चला जाणून घेऊयात सविस्तर  (Pic: Pixabay/Unsplash)

2 / 5
व्हिस्कीत बर्फ टाकण्याची अनेक कारणं आहेत. असं केल्याने त्याच्या चवीत फरक पडतो. थंड होते आणि लोकं गरमीच्या दिवसातही पिणं पसंत करतात. गरमीच्या दिवसात ड्रिंक थंड पिणं बरं वाटतं. तसेच बर्फ टाकल्याने व्हिस्कीचा हार्ड फ्लेवर कमी करण्यास मदत होते. तसेच चव हलकी होते.  (Pic: Pixabay/Unsplash)

3 / 5
काही जणांच्या मते, व्हिस्कीत बर्फ टाकल्याने पिताने वेगळा सुगंध सुटतो. जसा बर्फ वितळतो तसा त्याचा फ्लेवर आणखी चांगला होत जातो. त्यामुळे पिण्याची अनुभूती वेगळी होत जाते. आता वाइनमध्ये बर्फ न घालण्याचं कारण काय? जाणून घ्या तज्ज्ञांकडून  (Pic: Pixabay/Unsplash)

4 / 5
वाइनमध्ये बर्फ का घातला जात नाही, याबाबत वाइन तज्ज्ञ सोनम हॉलंड यांनी मत मांडलं आहे. वाइनमध्ये बर्फ टाकला तर हळूहळू पाण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे वाइनची चव खराब होते. बर्फ वितळल्यानंतर आम्लता, गोडवा आणि चव बदलते. वाइन आम्लयुक्त पाण्यात बदलते.  (Pic: Pixabay/Unsplash)

5 / 5
वाइन तज्ज्ञ सोनम हॉलंड यांच्या मते, वाइनमध्ये इतर बाह्य गोष्टी मिसळल्या की त्याची चव नाहिशी होते. तसेच विचित्र वास येऊ लागतो. म्हणून वाइन थंड प्यायची इच्छा असेल तर अनेक जण त्यात बर्फ घालण्याऐवजी बाटली फ्रिजमध्ये थंड करतात.  (Pic: Pixabay/Unsplash)