पावसाळ्यात मीठ कोरडे ठेवण्यासाठी सर्वात सोपा घरगुती उपाय, केला तर नेहमी मीठ राहिल कोरडे

99 टक्के महिलांना माहितच नाही पावसाळ्यात मीठ कोरडे ठेवण्याचा घरगुती उपाय. जो वापरल्यास पावसाळ्यात कधीच ओले होणार नाही मीठ. जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Jul 31, 2026 | 5:33 PM
1 / 5
पावसाळा सुरू होताच अनेक घरांमध्ये स्वयंपाकघरातील एक सामान्य समस्या डोके वर काढते. मीठ आणि साखरेच्या डब्यात ओलावा साचून मीठ घट्ट होणे, गुठळ्या होणे किंवा चमच्याने काढणे कठीण होणे, अशी अडचण निर्माण होते.

पावसाळा सुरू होताच अनेक घरांमध्ये स्वयंपाकघरातील एक सामान्य समस्या डोके वर काढते. मीठ आणि साखरेच्या डब्यात ओलावा साचून मीठ घट्ट होणे, गुठळ्या होणे किंवा चमच्याने काढणे कठीण होणे, अशी अडचण निर्माण होते.

2 / 5

यामागचे मुख्य कारण म्हणजे पावसाळ्यात हवेत वाढलेली आर्द्रता. मीठाचे कण हवेतला ओलावा सहज शोषून घेत असल्याने ते लवकर ओलसर होते. ही समस्या टाळण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात.

3 / 5

मीठाच्या डब्यात काही तांदळाचे दाणे ठेवल्यास ते अतिरिक्त ओलावा शोषून घेतात आणि मीठ कोरडे राहण्यास मदत होते. तसेच कॉफी बीन्स किंवा काही सुक्या राजम्याचे दाणेही ओलावा कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात. लवंग वापरता येते, मात्र तिचा सुगंध मीठात येऊ नये म्हणून ती कापडात बांधून ठेवावी.

4 / 5

याशिवाय मीठ आणि साखरेचे डबे नेहमी कोरड्या, हवेशीर आणि थंड ठिकाणी ठेवावेत. गॅस, खिडकी किंवा वाफ येणाऱ्या जागेजवळ ते ठेवणे टाळावे. दर्जेदार डब्यांचा वापर करावा आणि डबा उघडल्यानंतर लगेच घट्ट बंद करावा. तसेच मीठ काढताना नेहमी पूर्णपणे कोरड्या चमच्याचाच वापर करावा.

5 / 5

या साध्या उपायांचे पालन केल्यास पावसाळ्यातही मीठ आणि साखर दीर्घकाळ कोरडी राहतील आणि स्वयंपाकघरातील ही नेहमीची समस्या सहज टाळता येईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us