Interesting Facts : किर्र रात्री पिंपळाच्या झाडावर खरंच भूत असतं? एकदा झोप लागली की…नेमकं सत्य काय?

लहानपणापासून पिंपळाच्या झाडाखाली रात्री झोपू नये, असं तुम्ही ऐकलं असेल. पण या समजुतीमागे नेमकं कारण काय आहे, जाणून घ्या.

| Updated on: Oct 13, 2026 | 8:28 PM
1 / 7
पिंपळाच्या झाडाखाली रात्री झोपू नये, असं तुम्हीही लहानपणापासून ऐकलं असेल. काही जण तर रात्री झाडाजवळ जायला सुद्धा घाबरतात. पण खरंच पिंपळाच्या झाडावर भूत किंवा चेटकिण असते का? चला जाणून घेऊयात काही रंजक गोष्टी

पिंपळाच्या झाडाखाली रात्री झोपू नये, असं तुम्हीही लहानपणापासून ऐकलं असेल. काही जण तर रात्री झाडाजवळ जायला सुद्धा घाबरतात. पण खरंच पिंपळाच्या झाडावर भूत किंवा चेटकिण असते का? चला जाणून घेऊयात काही रंजक गोष्टी

2 / 7

दिवसा सूर्यप्रकाशाच्या मदतीने झाडं प्रकाशसंश्लेषण करतात आणि ऑक्सीजन सोडतात. रात्री ही प्रक्रिया थांबते.मात्र झाडांचा श्वसनाचा क्रियाकालाप सुरूच राहतो. या प्रक्रियेत झाडं ऑक्सिजन वापरतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडतात.

3 / 7

पिंपळाच्या या क्रियाकलापामुळे झाडापाशी मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड जमा होतो. त्यामुळे श्वास घेण्यास कठीण होते. छातीत भारीपणा जाणवू शकतो.

4 / 7

जुन्या आणि मोठ्या झाडांवर पक्षी, कीटक, वटवाघूळं आणि इतर जीवांचा वावर असतो. काही जीव रात्री सक्रिय होतात. त्यामुळे रात्री झाडाखाली झोपणं धोकादायक मानलं जातं.

5 / 7

वाळलेल्या फांद्या पडण्याचा धोका : मोठ्या झाडांच्या वाळलेल्या फांद्या जोरदार वारा किंवा वादळामुळे खाली पडू शकतात. अंधारात हा धोका सहज लक्षात येत नाही.त्यामुळे रात्री कोणत्याही झाडाखाली झोपणं धोकादायक असतं

6 / 7

मग भूत चेटकिणीच्या गोष्टी कशा सुरू झाल्या? : जुन्या काळात रात्री झाडांजवळ घडणाऱ्या अनोळखी घटना, अंधार आणि प्राण्यांच्या हालचालीमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण होत असावी. या अनुभवापैकी कालांतराने भूत - चेटकिणींच्या गोष्टी तयार झाल्या असाव्या

7 / 7

वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us