हे घराणं मागच्या 41 वर्षापासून स्वः खर्चाने कुस्तीचं मैदान भरवतंय, युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून तिसऱ्या पिढीचं कौतुक
राजर्षी छत्रपती शाहु महाराजांनी कुस्तीला दिलेल्या राजाश्रयामूळे अनेक नामवंत पैलवान गावोगावी तयार झाले आहेत.
1 / 5

राजर्षी छत्रपती शाहु महाराजांनी कुस्तीला दिलेल्या राजाश्रयामूळे अनेक नामवंत पैलवान गावोगावी तयार झाले आहेत.
2 / 5

कुस्तीचा प्रसार व्हावा म्हणून गावात भरणाऱ्या जत्रेच्या निमित्ताने कुस्तीची मैदाने भरवण्यात येत होती.
3 / 5

ही परंपरा खऱ्या अर्थाने जोपासली आहे ती, खेबवड्याचे पैलवान सुभाषराव वाडकर यांनी असं युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
4 / 5

सुभाषरावांचे वडील बळवंतराव वाडकर यांनी १९५२साली गावच्या यात्रे निमित्त कुस्ती मैदान भरवण्यास सुरुवात केली. हीच परंपरा सुभाषरावांनी कायम ठेवली असून गेली ४१ वर्ष अखंडपणे ते स्वःखर्चाने मैदान भरवत असतात.
5 / 5

आजपर्यंत या मैदानात अनेक नामवंत मल्ल कुस्ती करुन गेले आहेत. सुभाषराव वाडकरांचे दोन्ही चिरंजीव सुयोग वाडकर व प्रशांत वाडकर आता हीच परंपरा चालवत असल्याचे पाहून मनापासून आनंद झाला.
Follow Us