
झी मराठी वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे 'लागिरं झालं जी'. या मालिकेने अल्पावधीत आपला चाहता वर्ग निर्माण केला होता. या मालिकेतील पात्रांची नाव आजही प्रेक्षकांच्या चांगली लक्षात आहेत.

या मालिकेला ग्रामीण पार्श्वभूमी होती. लष्करात भरती होण्यासाठी प्रयत्न करणारा अज्या, त्याच्यावर प्रेम करणारी शितली या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलच. पण पुष्पा मामी सुद्धा प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली.

पुष्पा मामीच हे पात्र रंगवलेले विद्या सावळे यांनी. त्यांनी मामी रंगवताना अशी काही छाप उमटवली की, मालिका सोडल्यानंतरही प्रेक्षकांना त्यांची आठवण येत राहिली.

'लागिरं झालं जी' मालिकेने विद्या सावळे यांना एक ओळख मिळवून दिली. या मालिकेतील त्यांची व्यक्तीरेखा प्रचंड गाजली. विद्या सावळे कुठेही दिसल्या, तरी प्रेक्षक आजही त्यांना मामी म्हणूनच हाक मारतात.

विद्या सावळे या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या आहेत. विद्या सावळे यांना उपजतच अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना त्यांनी नाटकामध्ये काम केलं होतं. विद्या सावळे यांनी नंतर कलर्स वाहिनीवरील "सिंधुताई माझी माई - गोष्ट चिंधीची" या मालिकेतही काम केलं.