
रत्नागिरी : जीत के हारने वाले को खोके सरकार कहते है, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदेगटावर (Eknath Shinde) हल्लाबोल केलाय. शिंदेगटाने पैसे घेऊन भाजपशी युती केली, असा आरोप वारंवार केला जातो. आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा त्याचा उल्लेख केलाय. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान झालेल्या भाषणात त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय.