नव्या खासदारांमध्ये निम्मे खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे!

| Updated on: May 27, 2019 | 12:35 PM

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. नव्या लोकसभा सभागृहात जवळपास निम्मे नवनिर्वाचित खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) या संस्थेच्या अहवालानुसार, 539 विजयी खासादरांपैकी 233 खासादारांवर गुन्हे दाखल आहेत. म्हणजेच, एकूण खासादारांपैकी 43 टक्के खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. लोकसभेत सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपच्या 116 खासदारांवर (39 टक्के) गुन्हे दाखल […]

नव्या खासदारांमध्ये निम्मे खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे!
Follow us on

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. नव्या लोकसभा सभागृहात जवळपास निम्मे नवनिर्वाचित खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (ADR) या संस्थेच्या अहवालानुसार, 539 विजयी खासादरांपैकी 233 खासादारांवर गुन्हे दाखल आहेत. म्हणजेच, एकूण खासादारांपैकी 43 टक्के खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.

लोकसभेत सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपच्या 116 खासदारांवर (39 टक्के) गुन्हे दाखल आहेत. त्यापाठोपाठ, काँग्रेसच्या 29 खासदारांवर (57 टक्के), जदयूच्या 13 खासदारावर (81 टक्के), डीएमकेच्या 10 खासदारांवर (43 टक्के) आणि तृणमूल काँग्रेसच्या 9 खासदारांवर (41 टक्के) गुन्हे दाखल आहेत. यातील 29 टक्के खासदारांवर गंभीर प्रकारचे गुन्हे आहेत. म्हणजेत, बलात्कार, हत्या, हत्येचा प्रयत्न इत्यादी प्रकारेच गुन्हेही यातील काही खासदारांवर आहेत.

  • 2014 साली एकूण विजयी खासदारांपैकी 185 खासदारांवर (34 टक्के) गुन्हे दाखल होते. त्यापैकी 112 खासदारांवर अत्यंत गंभीर प्रकारचे गुन्हे होते.
  • 2009 साली एकूण विजयी खासदारांपैकी 162 खासदारांवर (30 टक्के) गुन्हे दाखल होते. त्यापैकी 14 टक्के खासदारांवर गंभीर प्रकारचे गुन्हे होते.

धक्कादायक म्हणजे नव्या लोकसभेत विजयी होऊन आलेल्या 11 खासदारांवर हत्येचे गुन्हे दाखल असल्याचे एडीआरने आपल्या अहवालात म्हटले आहे. यात भाजपचे 5, बसपचे 2 आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, YSR काँग्रेस, अपक्षातील प्रत्येकी एका खासदाराचा समावेश आहे.

नवनिर्वाचित खासदारांमधील 29 खासदारांवर वादग्रस्त वक्तव्य आणि द्वेषयुक्त भाषणांचेही गुन्हे दाखल आहेत.

भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर बॉम्बस्फोटातील आरोप

भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर ही मध्य प्रदेशातील भोपाळमधून विजयी झाली आहे. तिच्यावर 2008 साली घडवण्यात आलेल्या मालेगाव बॉम्बस्फोटातील सहभागाचा आरोप आहे. भाजपने साध्वी प्रज्ञाला उमेदवारी दिल्याने प्रचंड टीकाही झाली होती. शिवाय, मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या आयपीएस हेमंत करकरे यांचा अपमान करणारे वक्तव्यही प्रज्ञा ठाकूरने केले होते.

काँग्रेस खासदारावर 204 गुन्हे

केरळधील इडुक्की या लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या डिन कुरिआकोस या काँग्रेसच्या खासदारावर एक-दोन नव्हे, तर तब्बल 204 गुन्हे दाखल आहेत. यात दरोड्याचाही गुन्हा दाखल आहे.