AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रवी राणा, बच्चू कडू यांच्यानंतर आता शिंदे गटातील आणखी दोन नेत्यांमध्ये वाद, मंत्र्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

एकीकडे बच्चू कडू आणि रवी राणा यांचातील वाद विकोपाला गेला असतानाच आता शिंदे गटातील आणखी दोन आमदारांचा वाद समोर आला आहे.

रवी राणा, बच्चू कडू  यांच्यानंतर आता शिंदे गटातील आणखी दोन नेत्यांमध्ये वाद, मंत्र्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
| Updated on: Oct 27, 2022 | 10:41 AM
Share

जळगाव : एकीकडे बच्चू कडू (Bachu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांचातील वाद विकोपाला गेला असतानाच आता शिंदे गटातील आणखी दोन नेत्यांचा वाद समोर आला आहे. मंत्री गुलाबराव पाटील विरूद्ध आमदार चिमणराव पाटील असा नवा वाद समोर आला आहे. गुलाबराव पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार देखील केली आहे. आमदारांमध्ये सुरू असलेल्या वादामुळे शिंदे गटासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत.

काय आहे नेमका वाद?

शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती. राष्ट्रवादीच्या नेत्याला माझ्याविरोधात निधी दिला जात असल्याचं चिमणराव पाटील यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे.

राणा विरूद्ध बच्चू कडू

दुसरीकडे आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद देखील मिटण्याचं नाव घेत नाहीये. रवी राणा यांनी पुरावे द्यावेत अन्यथा आम्ही सात ते आठ आमदार एक नोव्हेंबरला वेगळा विचार करू असा इशाराच बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला आहे. बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्या खोक्याच्या आरोपाला सडेतोड उत्तर दिले आहे.

मी एकटाच गुवाहाटीला गेलो नव्हतो, माझ्यासोबत आणखी पन्नास आमदार होते. राणा यांच्या आरोपांमुळे त्या 5o आमदारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 50 आमदारच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Follow Us
यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
Sanjay Raut on Dasara Melava : यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश.....
Actor Imran Khan : अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे निर्देश?
सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; कोणत्या गोष्टींवर....
Sunil Tatkare | सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; नेमक्या कोणत्या गोष्टींवर झाली चर्चा?
अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला...
Anganwadi Sevika Bhaubeej Gift : अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला मिळणार एवढे पैसे
पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी....
Shivsena : पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी; नेमकं काय घडतंय? 
तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं
Yo Yo Honey Singh : तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं समन्स; पुढे काय होणार?
काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; मंदिर व्यवस्थापनाने....
Kashi Vishwanath Temple : काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; वकिलांचा गंभीर आरोप, मंदिर व्यवस्थापनाने काय दिलं उत्तर?
मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
Mumbai FDA : मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन