AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंदापूरची जागा कुणाला? अजित पवार म्हणतात…

इंदापूर : इंदापूर विधानसभेची जागा काँग्रेसला की राष्ट्रवादीला, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षांकडून दावे-प्रतिदावे होत असतानाच काँग्रेसच्या नेत्यांनी विधानसभेची जागा काँग्रेसलाच द्यावी, यासाठी आग्रह धरला आहे. इंदापूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी तर लोकसभा निवडणुकीपूर्वी विधानसभेच्या उमेदवारीचा निर्णय झाला तरच आघाडीच्या उमेदवारांचं काम करु अशी भूमिका घेतली आहे. असे असतानाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “इंदापूर […]

इंदापूरची जागा कुणाला? अजित पवार म्हणतात...
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM
Share

इंदापूर : इंदापूर विधानसभेची जागा काँग्रेसला की राष्ट्रवादीला, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दोन्ही पक्षांकडून दावे-प्रतिदावे होत असतानाच काँग्रेसच्या नेत्यांनी विधानसभेची जागा काँग्रेसलाच द्यावी, यासाठी आग्रह धरला आहे. इंदापूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी तर लोकसभा निवडणुकीपूर्वी विधानसभेच्या उमेदवारीचा निर्णय झाला तरच आघाडीच्या उमेदवारांचं काम करु अशी भूमिका घेतली आहे. असे असतानाच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “इंदापूर विधानसभेचा प्रश्न आला कुठे?” असा सवाल करत, “आम्ही लोकसभेच्या 48 जागांबाबत चर्चा करतोय. आधी लोकसभा जिंकायचीय आणि नंतर विधानसभेबाबत चर्चा करु”, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे इंदापूरबाबतचा तेढ आणखीच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इंदापूर तालुक्यातल्या पोंधवडी येथील विविध विकासकामांचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झालं. त्यानंतर इंदापूर विधानसभेबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल अजित पवार यांना विचारणा केली असता, त्यांनी आम्ही सध्या लोकसभेच्या 48 जागांबाबत चर्चा करतोय, त्यामुळे आधी लोकसभा जिंकायचीय आणि मग विधानसभेबाबत चर्चा करु, असं सांगत इंदापूर विधानसभेच्या जागेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

इंदापूरची जागा काँग्रेसची होती आणि काँग्रेसकडेच राहील : विश्वजित कदम 

आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित लढवण्याचा निर्णय काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्यांनी घेतला आहे. मात्र मागील 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. त्यानंतर केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपविरोधात निर्माण झालेली नाराजी लक्षात घेत सर्व विरोधी पक्षांची मोट बांधत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आघाडी झाली असली तरी इंदापूरमध्ये झालेल्या विविध कार्यक्रमांमध्ये अजित पवार यांनी एकवेळ आघाडी झाली नाही तरी चालेल, पण इंदापूरची आगा काँग्रेसला देणार नसल्याचा पवित्रा घेतला होता.

विशेष म्हणजे, काँग्रेस कार्यकर्त्यांनीही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील, रमेश बागवे, संग्राम थोपटे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांचे प्रामाणिकपणे काम करुनही विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून कुरघोडीचे राजकारण होत असल्याबाबत खंत मांडली होती. तसेच विधानसभेची जागा कोणत्या पक्षाला हे जाहीर केल्याशिवाय लोकसभेला आघाडीच्या उमेदवारांचं काम करणार नसल्याची भूमिका घेतली होती. त्याच अनुषंगाने काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून इंदापूरची जागा काँग्रेसला देण्याबाबत आग्रही मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता अजित पवार यांनी आधी लोकसभा जिंकायची मग विधानसभेची चर्चा करण्याची भूमिका घेतल्यामुळे इंदापूरच्या जागेबाबत तेढ वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…