इंदापूरची जागा काँग्रेसची होती आणि काँग्रेसकडेच राहील : विश्वजित कदम 

इंदापूर (पुणे) : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी निश्चित झाली असून, दोन्ही पक्षांच्या एकत्रित प्रचारसभाही सुरु झाल्या आहेत. इंदापूरमध्ये मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादीत विधानसभेच्या जागेवरुन संघर्ष सुरु झालेला पहायला मिळतो आहे. त्यामुळे आज इंदापूरमध्ये झालेल्या काँग्रेस कार्यकर्ता संवाद शिबिरात आमदार विश्वजीत कदम यांनी या विषयावर बोट ठेवत, इंदापूरची जागा काँग्रेस होती आणि काँग्रेसचीच राहील, असं म्हणत पुन्हा इंदापूर …

इंदापूरची जागा काँग्रेसची होती आणि काँग्रेसकडेच राहील : विश्वजित कदम 

इंदापूर (पुणे) : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी निश्चित झाली असून, दोन्ही पक्षांच्या एकत्रित प्रचारसभाही सुरु झाल्या आहेत. इंदापूरमध्ये मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादीत विधानसभेच्या जागेवरुन संघर्ष सुरु झालेला पहायला मिळतो आहे. त्यामुळे आज इंदापूरमध्ये झालेल्या काँग्रेस कार्यकर्ता संवाद शिबिरात आमदार विश्वजीत कदम यांनी या विषयावर बोट ठेवत, इंदापूरची जागा काँग्रेस होती आणि काँग्रेसचीच राहील, असं म्हणत पुन्हा इंदापूर विधानसभेच्या जागेवर काँग्रेसचाच हक्क असल्याचं सांगितलं. दुसरीकडे, राजकारणात पाटील आणि कदमांना प्रचंड संघर्षाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्यातूनच यशस्वी वाटचाल करण्याची मानसिकता असल्याचं सांगत राष्ट्रवादीच्या नेत्यांना चिमटा काढला.

इंदापूरमध्ये आज काँग्रेस कार्यकर्ता संवाद शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार विश्वजीत कदम, प्रणिती शिंदे, उल्हास पवार, जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनीही या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली. यावेळी बोलताना विश्वजित कदम यांनी भाजप सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. या देशाची भाजपनं लूट केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

यावेळी बोलताना विश्वजीत कदम यांनी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला चिमटे काढले. राजकारणात पाटील आणि कदम यांना नेहमीच संघर्ष करावा लागला आहे. त्यामुळे आता याच संघर्षातून वाटचाल करण्याची मानसिकता ठेवूनच पुढे जायचा निश्चय केल्याचं त्यांनी सांगितलं.

पुणे जिल्ह्याचं राजकारण सांभाळणं ही सोपी गोष्ट नाही. इथे अनेकांच्या अडथळ्यांना सामोरं जावं लागतं. त्याही परिस्थितीत काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेस बळकट केल्याचं त्यांनी सांगितलं.

मागील काही काळात इंदापूरच्या विधानसभेच्या जागेवरून बऱ्याच चर्चा केल्या जात आहेत. मात्र ही जागा पूर्वीपासून काँग्रेसची होती आणि आताही ती काँग्रेसकडेच राहील, असं सांगत विश्वजीत कदम यांनी इंदापूरच्या जागेसाठी आग्रही असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळं काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी इंदापूरच्या जागेसाठी आग्रही भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वी इंदापूरची जागा काँग्रेसला की राष्ट्रवादीला हे स्पष्ट झाल्याशिवाय काँग्रेस कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराचं काम करणार नाहीत, अशी भूमिका घेण्यात आली होती. त्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार संग्राम थोपटे, रमेश बागवे, संजय जगताप या काँग्रेस नेत्यांनी याबद्दल आग्रही भूमिका मांडली होती. त्यानंतर आता पुन्हा इंदापूर विधानसभेच्या जागेचा चर्चेत आला आहे. दिवसेंदिवस इंदापूरच्या जागेसाठी आग्रही मागणी होत असताना राष्ट्रवादीचे वरीष्ठ नेते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *