AMC Election 2022, ward 19 : अकोला महापालिका निवडणूक, प्रभाग क्रमांक 19 मध्ये कोण साधणार नेमका नेम?

| Updated on: Aug 17, 2022 | 2:15 AM

अकोला मनपा प्रभाग 19 अ मध्ये अनुसूचित जाती महिला, प्रभाग 19 ब मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व प्रभाग 19 क मध्ये सर्वसाधारण महिला ही जागा राखीव आहे.

AMC Election 2022, ward 19 : अकोला महापालिका निवडणूक, प्रभाग क्रमांक 19 मध्ये कोण साधणार नेमका नेम?
Follow us on

अकोला : राज्यातील महापालिकेतील निवडणुकींचा बिगूल वाजला. त्यामुळं सर्व राजकीय पक्ष कामाला लागले. आधी चार नगरसेवकांचा (corporators) एक वॉर्ड होता. आता तीन नगरसेवक एका वॉर्डातून निवडून येणार आहेत. प्रभाग आरक्षणही जाहीर झालं. त्यामुळं दिग्गजांना धक्के बसले. काहींना मनाजोगे आरक्षण (Reservation) मिळाल्यानं ते खुश आहेत. तर काही आरक्षण जाहीर झाल्यानं नाराज आहेत. कारण त्यांना दुसऱ्या भागातून निवडणुकीची (election) तयारी करावी लागणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपनं सत्ता हस्तगत केली होती. यावेळी गणित बिघडली आहेत. 2017 मध्ये 80 पैकी 48 जागा भाजपनं बळकावल्या होत्या. याहीवेळी सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपनं जोरदार तयारी केली आहे.

अकोला मनपा प्रभाग क्रमांक 19 अ

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
काँग्रेस
शिवसेना
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष

अकोला मनपा प्रभाग क्रमांक 19 ची लोकसंख्या व आरक्षण

अकोल्यात पूर्वी 20 प्रभाग होते. आता 30 प्रभाग आहेत. अकोला महापालिकेतील प्रभाग क्रमांक 19 ची लोकसंख्या 18 हजार 883 आहे. त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या 322 आहे. अनुसूचित जमातीची लोकसंख्या 322 आहे. अकोला महापालिकेत एकूण नगरसेवकांची संख्या 91 राहणार आहे. त्यापैकी 46 जागा या महिलांसाठी राखीव राहणार आहेत. अनुसूचित जातीसाठी 15 जागा राखीव राहणार आहेत. त्यापैकी 8 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमातीच्या दोन जागा आहेत. त्यापैकी एक जागा महिलांसाठी राखीव आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 24 जागा आहेत. त्यापैकी 12 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण गटासाठी 50 जागा आहेत. त्यापैकी 25 जागा या महिलांसाठी राखीव आहेत. अकोला मनपा प्रभाग 19 अ मध्ये अनुसूचित जाती महिला, प्रभाग 19 ब मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग व प्रभाग 19 क मध्ये सर्वसाधारण महिला ही जागा राखीव आहे. मागील निवडणुकीत प्रभाग 19 मध्ये चारही जागा भाजपनं जिकंल्या होत्या. यावेळी प्रभाग रचनेत बदल झाला. एका प्रभागातून तीनच नगरसेवक निवडून द्यायचे आहेत.

हे सुद्धा वाचा

अकोला मनपा प्रभाग क्रमांक 19 ब

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष

अकोला मनपा प्रभाग 19 ची व्याप्ती

कृषी नगर भाग, जवाहर नगर, गोकुळ कॉलनी, सुधीर कॉलनी, मुकुंद नगर, शास्त्रीनगर, अमानखाँ प्लॉट, तोष्णीवाल ले-आऊट, लाला लजपतराय सोसायटी. उत्तरेकडं सिव्हिल लाईन्स चौकापासून पूर्वेकडे रणपिसेनगर, रस्त्याने याच रस्त्यावरील इंद्रजित देशमुख यांचे घरापर्यंत तेथून पुढे पूर्वेस गजानन मानकर यांच्या घरापर्यंत तेथून पुढे पंकज पटेल यांच्या घरापर्यंत तेथून पुढे पूर्वेकडे जिजाऊवाडा अपार्टमेंटपर्यंत तेथून रस्त्याने खंडवा हिंगोली रेल्वे लाईनचे संगमापर्यंत. पूर्वेकडं हिंगोली रेल्वे लाईन व संताजीनगर रस्ता यांच्या संगमापासून दक्षिणेकडे खंडवा हिंगोली रेल्वे लाईन्सने न्यू भीम युवक व्यायाम शाळेकडून येणाऱ्या रस्त्याने संगमापर्यंत तेथून पुढे पश्चिमेस युवक व्यायाम शाळेपर्यंत तेथून पुढे दक्षिणेस रस्त्याने भरत गवई यांच्या घरापर्यंत. तेथून पुढे पश्चिमेस रस्त्याने वसंतराव नाईक चौकातील खाडे टेलर्स यांच्या दुकानापर्यंत तेथून पुढे दक्षिणेस मधुकर वरघट यांच्या घरापर्यंत तेथून पुढे पश्चिमेस नमन किराणा (कैलास वानखेडे) पर्यंत तेथून पुढे नमन किराणाच्या मागील सेवागल्ली. दक्षिणेस राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील शकील मोटर्सपासून पश्चिमेकडे रस्त्याने नेहरुपार्क चौकापर्यंत. पश्चिमेस नेहरू पार्क चौकातून उत्तरेकडं रस्त्याने सिव्हील लाईन्स चौकापर्यंत.

अकोला मनपा प्रभाग क्रमांक 19 क

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
अपक्ष