AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AMC Election 2022 Ward 16 | भाजपला वंचितसहित काँग्रेस, राष्ट्रवादीचे तगडे आव्हान, सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग चमत्कार घडवेल?

AMC Election 2022 Ward 16 | भाजपला वंचिसहित काँग्रेस आणि राष्ट्रवादीने गेल्या निवडणुकीत तगडे आव्हान दिले होते. सोशल इंजिनिअरिंगसाठी अकोल्याची भूमी पोषक मानण्यात येते. या महापालिका निवडणुकीत हा प्रयोग यशस्वी होईल का?

AMC Election 2022 Ward 16 | भाजपला वंचितसहित काँग्रेस, राष्ट्रवादीचे तगडे आव्हान, सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग चमत्कार घडवेल?
सोशल इंजिनिअरिंगच्या भुमीवर कोणाचे नाणे वाजणारImage Credit source: TV9marathi
| Updated on: Aug 16, 2022 | 9:02 AM
Share

AMC Election 2022 Ward 16 | पश्चिम विदर्भात(Western Vidarbha) भाजपने (BJP)पक्ष संघटना मजबूत करणाऱ्यावर गेल्या पाच वर्षात सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे. अकोला हे सर्वच चळवळींचे केंद्र ठरलं आहे. भाजप आणि संघाच्या मुशीत तयार होणाऱ्या या शहरात वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aaghadi) प्रयोग ही यशस्वी ठरला आहे. पण अमरावती आणि अकोला जिल्ह्यावर भाजपने विशेष लक्ष दिले आहे. अमरावतीत खा. डॉ.अनिल बोंडे, आ. श्रीकांत भारतीय, तर अकोल्यात खा. संजय धोत्रे, बुलडाण्यात डॉ. संजय कुटे यांच्या रुपाने नवीन सत्ता समीकरण राबविण्याचा भाजपचा सातत्याने प्रयत्न सुरु आहे. तसा हा पट्टा संघाच्या ही मुशीतील आहे. संघाशी संबंधित राज्यातील सर्वात मजबूत आणि मोठ्या सहकारी बँका याच बुलडाणा, खामगाव आणि अकोला पट्यातील आहेत. सोबतच शैक्षणिक संस्थांचे ही मोठे जाळे आहे. अकोला महापालिकेच्या निवडणुकीची (AMC Election 2022) तयारी भाजपने सर्वांच्या अगोदर सुरु केली आहे. अनेक जणांना भाजपच्या आक्रमक शैलीने भूरळ घातली आहे.

आतापर्यंत काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना असा महापालिकेचा प्रवास राहिलेला आहे. 2017 मध्ये भाजपने मिशन अकोला महापालिका राबविले. लोट्स ऑपरेशनद्वारे भाजपने महापालिकेत इतिहास घडवला. महापालिका निवडणुकीत 80 पैकी तब्बल 48 जागांवर भाजपने मुसंडी मारली. एकहाती अकोला महापालिकेची सत्ता मिळवली. सध्या भाजपसह काँग्रेसला गटातटाच्या राजकारणाने ग्रासले आहेत. या पक्षांची अंतर्गत शकल पडली आहेत. त्याचा फायदा नव्या जोमातील शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीला मिळू शकते. दलित, मुस्लीम आणि बहुजन वस्तीत भाजपपुढे काँग्रेससह वंचितचे ही तगडे आव्हान राहणार आहे.

महापालिकेतील लोकसंख्येचे गणित

अकोल्यातील लोकसंख्या 18,18,617 एवढी आहे. त्यात पुरुषांची लोकसंख्या 9,36,226 एवढी असून महिलांची लोकसंख्या 8,82,391 इतकी आहे. अकोला महापालिकेत एकूण 91 जागा आहेत. त्यापैकी 46 जागा महिलांसाठी राखीव आहेत. 15 जागा अनुसूचित जातीसाठी आणि दोन जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. महापालिकेच्या एकूण 30 प्रभागातून 91 नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहे. तर 29 प्रभागातून तीन तर एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. अकोला महापालिकेत भाजपची सत्ता आहे. वॉर्ड क्रमांक 16 मध्ये एकूण 16,306 लोकसंख्या आहे. त्यात 399 अनुसूचित जातीचे तर 159 अनुसूचित जमातीचे लोक आहेत.

वॉर्ड क्रमांक 16 मध्ये कोणता परिसर

या प्रभागात नाजूक नगर, गोरक्षण झोपडपट्टी, फिरदोस कॉलनीचा काही भाग, लहरीया प्लॉंट, रायली जिन, सावतराम चाळ, रिगल टॉकीज परिसर, शालीन टॉकीज परिसर हा भाग येतो.

गेल्या वेळी निवडून आलेले नगरसेवक

वॉर्ड क्रमांक 16 अ आम्रपाली उपरवट भाजप वॉर्ड क्रमांक 16 ब माधुरी बडोने  भाजप वॉर्ड क्रमांक 16 क सोनी आहुजा  भाजप वॉर्ड क्रमांक 16 ड फैयाज खान   राष्ट्रवादी

पक्षउमेदवारविजयी
भाजप
काँग्रेस
वंचित बहुजन आघाडी
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
काँग्रेस
वंचित बहुजन आघाडी
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
काँग्रेस
वंचित बहुजन आघाडी
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
इतर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.