AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमरावती शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढतीची चिन्हं, पहिल्यांदाच महाविकास आघाडी vs भाजप सामना

सेना-भाजप वेगवेगळे लढत असल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी भाजप सज्ज आहे

अमरावती शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढतीची चिन्हं, पहिल्यांदाच महाविकास आघाडी vs भाजप सामना
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Nov 05, 2020 | 10:55 AM
Share

अमरावती : कोरोना काळात महाराष्ट्रातील पहिल्या निवडणुकीचे बिगुल निवडणूक आयोगाने फुंकले आहे. अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली असून 1 डिसेंबर रोजी मतदान, तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. तर अमरावती शिक्षक मतदारसंघातील विद्यमान शिवसेना-भाजप युतीचे आमदार श्रीकांत देशपांडे यांना भाजपाचे संभाव्य उमेदवार नितीन धांडे यांच्याकडून तगडे आव्हान मिळणार आहे. (Amravati Teacher Graduate Constituency Election Candidate)

मागील निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष अरुण शेळके यांच्याकडून आव्हान मिळाले होते. श्रीकांत देशपांडे यांनी अरुण शेळके यांचा पराभव करत विजय मिळवला होता. आता शिवसेना-भाजप वेगवेगळ्या निवडणुका लढवीत आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी भाजप सज्ज झाला आहे.

शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामुख्याने गेल्या दहा वर्षांपासून शिक्षकांच्या प्रश्नासाठी शेखर भोयर सातत्याने काम करताना दिसत आहेत. श्रीकांत देशपांडे यांच्याबद्दल मात्र शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर त्यांच्या कार्यकाळात दिसून आला. या निवडणुकीत भाजपकडून नितीन धांडे यांचं नाव चर्चेत आहे.

शेखर भोयर हेसुद्धा शिक्षक महासंघाकडून निवडणूक लढवत आहेत. शेखर भोयर हे मागील निवडणुकीत पराभूत झाले असूनही त्यांनी काम सुरुच ठेवले. त्यामुळे मी कोणत्याही राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे हे निष्क्रिय असल्याचा आरोप भोयर यांनी केला. तर शिक्षण संघर्ष समितीचे वतीने नेहमी चर्चेत असलेल्या संगीता शिंदे सुद्धा निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे अमरावती विभागात विद्यमान आमदार श्रीकांत देशमुख, नितीन धांडे, शेखर भोयर आणि संगीता शिंदे यांच्यात लढत होणार आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम :

नामनिर्देशन पत्र – गुरुवार, दि. 12 नोव्हेंबर 2020 पर्यंत भरता येणार आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी – शुक्रवार, दि. 13 नोव्हेंबर 2020 रोजी करण्यात येणार आहे. नामनिर्देशपत्र दाखल केलेल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मंगळवार, दि. 17 नोव्हेंबर 2020 रोजीपर्यंत मागे घेता येणार आहे विभागात एकूण मतदान केंद्र : 77 अमरावती शिक्षक मतदारसंघात 5 जिल्हे येतात अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलडाणा

(Amravati Teacher Graduate Constituency Election Candidate)

जिल्हानिहाय मतदार अमरावती : 10,088 अकोला : 6,000 बुलडाणा : 7,422 वाशिम : 3,773 यवतमाळ : 7,407 एकूण : 34,690 मतदार

संबंधित बातम्या :

काँग्रेस नेते आशिष देशमुख अमरावतीतून विधान परिषदेवर जाण्याची शक्यता

नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार जवळपास निश्चित

(Amravati Teacher Graduate Constituency Election Candidate)

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...