नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार जवळपास निश्चित, भाजपचं मात्र ठरता ठरेना!

नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेसकडून अभिजित वंजारी यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. काँग्रेसकडून लवकरच त्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते. मात्र, भाजपकडून अनिल सोले की संदीप जोशी यांपैकी कुणाला उमेदवारी मिळणार? हे अद्याप समजू शकलेले नाही.

नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार जवळपास निश्चित, भाजपचं मात्र ठरता ठरेना!
सागर जोशी

|

Nov 05, 2020 | 8:48 AM

नागपूर: राज्यातील 5 पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांची निवडणूक जाहीर झाली आहे. कधीकाळी भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी प्रतिनिधित्व केलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. असं असलं तरी या ठिकाणी भाजपचा उमेदवार अद्यात निश्चित झालेला नाही. तर काँग्रेसकडून अभिजीत वंजारी यांच्या नावाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस नेत्यांमध्ये वंजारी यांच्या नावावर एकमत झाल्याचं बोललं जात आहे. (Congress candidate Abhijit Vanjari may be confirmed for Nagpur graduate constituency )

काँग्रेसकडून प्राध्यापक बबनराव तायवाडे यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपला दोन वेळा टक्कर देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश मिळालं नाही. त्यामुळे आता तरुण दमाचे अभिजित वंजारी यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर वंजारी आणि त्यांचे कार्यकर्ते जोरदार तयारी करत आहेत.

भाजपकडून अनिल सोले की संदीप जोशी?

काँग्रेसचा उमेदवार निश्चित मानला जात असला तरी दुसरीकडे भाजपकडून यंदा विद्यमान आमदार अनिल सोले (Anil Sole) यांच्याऐवजी नवा चेहरा दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी सध्या भाजपमधून महापौर संदीप जोशी (Sandeep Joshi) यांचं नाव आघाडीवर आहे. जोशी यांनी निवडणुकीची तयारी केल्याचंही बोललं जात आहे.

भाजपचे विद्यमान आमदार अनिल सोले हे दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे आता नव्या उमेदवाराला संधी देण्याची मागणी भाजपच्या युवा कार्यकर्त्यांकडून होत आहे. तर महापौर संदीप जोशी यांनी यापूर्वीच आपण महापालिका निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. पक्षाने त्यांना संकेत दिल्यामुळेच त्यांनी ही घोषणा केल्याचं कार्यकर्ते सांगतात. तर विद्यमान आमदार अनिल सोले यांचे कार्यकर्तेही कामाला लागलेले पाहायला मिळतात. प्रत्यक्ष गाठीभेटींवर सोले यांनी भर दिल्याचं दिसत आहे. त्यामुळं आपल्या हक्काच्या मतदारसंघात भाजप यंदा कुणाला उमेदवारी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या:

हक्काच्या पदवीधर मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण? पुन्हा अनिल सोले की महापौर संदीप जोशींना संधी?

राज्यातही निवडणुकांचा श्रीगणेशा; पदवीधर मतादरसंघांची निवडणूक जाहीर, 1 डिसेंबरला मतदान

Congress candidate Abhijit Vanjari may be confirmed for Nagpur graduate constituency

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें