AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना आमदार, नेत्यांची तातडीची बैठक, महायुतीच्या गोटात हालचाली वाढल्या

महायुतीमध्ये आता विधान परिषदेच्या जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरला आहे. त्यानंतर मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेना आमदार आणि नेत्यांची तातडीची बैठक घेतली आहे.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेना आमदार, नेत्यांची तातडीची बैठक, महायुतीच्या गोटात हालचाली वाढल्या
eknath shinde Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 31, 2026 | 6:29 PM
Share

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कोकणातील नेते आणि आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, निलेश राणे आणि भरत गोगावले यांची उपस्थिती होती. रायगड विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला गेल्यानंतर सर्व आमदार आणि नेत्यांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली. शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांनी युती धर्म पाळावा अशी सूचना यावेळी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. उद्या अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेनेचे नेते देखील उपस्थित राहणार आहेत.

मात्र दुसरीकडे अद्यापही रायगडच्या पालकमंत्रिपदावर कोणताही तोडगा निघालेला नाही.  दरम्यान रायगड विधान परिषदेची  जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादीला गेल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते महेंद्र दळवींची मुलगी जुईल दळवी या आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचा निर्णय देखील या बैठकीमध्ये झाला आहे. रायगड विधान परिषदेमधून आता अनिकेत तटकरे हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत.

असा आहे महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला 

समोर आलेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेच्या 6 जागांवर दावा करण्यात आला होता, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तीन जागांवर दावा करण्यात आला होता. तर दुसरीकडे भाजपची 17 पैकी 14 विधान परिषद मतदारसंघात अधिक ताकद असल्याने भाजपने 14 जागा लढवाव्यात अशी मागणी काही भाजप नेत्यांकडून होतं होती. त्यामुळे महायुतीमधील जागा वाटपाच्या चर्चेचं गुऱ्हाळ गेले अनेक दिवस सुरू होतं.  अखेर आता महायुतीमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. भाजप 11 जागा लढवणार आहे, तर शिवसेना शिंदे गट 4 आणि अजित पवार गट 2 जागा लढवणार आहे.

त्यापैकी रायगडची जागा ही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला गेली असून, इथून आता अनिकेत तटकरे हे विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज उद्या दाखल करणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आज शिवसेना शिंदे गटाची महत्त्वाची बैठक पार पडली. शिवसेनेच्या नेत्यांनी युतीचा धर्म पाळावा, अशा सूचना या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी आपले आमदार आणि नेत्यांना दिल्या आहेत.

Follow Us
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
एसटीच्या भाड्यात झाली इतक्या टक्क्यांनी वाढ ; ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांच्या खिशाला पडणार कात्री.

एसटीच्या भाड्यात झाली इतक्या टक्क्यांनी वाढ ; ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांच्या खिशाला पडणार कात्री

डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, इराणचा भीषण हल्ला; अमेरिकन लढाऊ विमानांचा खात्मा.

डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, इराणचा भीषण हल्ला; अमेरिकन लढाऊ विमानांचा खात्मा

नमाजवर संपूर्ण देशात बंदी घाला, थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकी कुणी केली मागणी?.

नमाजवर संपूर्ण देशात बंदी घाला, थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकी कुणी केली मागणी?

‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा.

‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा

Team India: रोहित शर्माला बाहेर काढण्यासाठी खेळी! यशस्वी जयस्वालचा वापर?.

Team India: रोहित शर्माला बाहेर काढण्यासाठी खेळी! यशस्वी जयस्वालचा वापर?

चेंबुर येथे म्हैसूर कॉलनीत केमिकल टँकरचा भीषण स्फोट,आजूबाजूच्या परिसरातील इमारतीच्या काचा तुटल्या.

चेंबुर येथे म्हैसूर कॉलनीत केमिकल टँकरचा भीषण स्फोट,आजूबाजूच्या परिसरातील इमारतीच्या काचा तुटल्या