अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणूक : उमेदवारीसाठी ठाकरे गटातून आणखी एक नाव चर्चेत

| Updated on: Oct 13, 2022 | 12:56 PM

ठाकरे गटातून उमेदवारीसाठी चर्चेत आलेलं नवं नाव कोणतं? या नावाच रमेश लटकेंशी काय संबंध? जाणून घ्या

अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणूक : उमेदवारीसाठी ठाकरे गटातून आणखी एक नाव चर्चेत
कोणतं नवं नाव चर्चेत?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Andheri East By poll Election) आता आणखी एक नाव चर्चेत आलंय. ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray) एक उमेदवार हा चर्चेत आला आहे. वॉर्ड क्रमांक 81 चे माजी नगरसेवक असलेल्या संदीप नाईक (Sandeep Naik) यांचं नाव उमेदवारीसाठी चर्चेत असल्याची माहिती मिळतेय. संदीप नाईक हे स्वर्गीय रमेश लटके यांची निकटवर्तीय म्हणूनही ओळखले जातात. ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे आता शिवसेनेकडून प्लान बी आखण्यात आला आहे. त्याचाच भाग म्हणून संदीप नाईक यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा सुरु असल्याचं कळतंय.

अंधेर पूर्व विधानसभा मतदारसंघात रमेश लटके याचं निर्विवाद वर्चस्व राहिलेलं होतं. या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या जागी आता पोटनिवडणूक होते आहे. या पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात असं सुरुवातीला सांगण्यात आलं. पण ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरुन राजकारण तापल्यानं शिवसेनेनं प्लान बी देखील सज्ज ठेवलाय.

हे सुद्धा वाचा

ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत हायकोर्टाकडून दिलासा मिळू शकला नाही, तर काय करायचं, याचा प्लान ठाकरे गटाकडून आखण्यात आला आहे. ऋतुजा लटके यांच्याऐवजी रमेश लटके यांच्या मातोश्रींनाही उमेदवारी देण्याचा विचार सुरु असल्याचं कळतंय. एकूण चार नावं आता चर्चेत असल्याचं समोर आलंय.

  1. कमलेश राय
  2. प्रमोद सावंत,
  3. दिवंगत रमेश लटके यांच्या मातोश्री
  4. संदीप नाईक

अवैध जात प्रमाणपत्रामुळे जेव्हा मुरजी पटेल यांचं नगरसेवक पद गेलं होतं, त्यानंतर संदीप नाईक हे तिथे नगरसेवक झाले होते. संदीप नाईक हे त्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचे नगरसेवक राहिलेले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा मुरजी पटेल विरुद्ध संदीप नाईक अशी निवडणूक अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि लटके कुटुंबीय यांच्या बुधवारी रात्री चर्चा झाली. लटके कुटुंबीय यांनी उद्धव ठाकरेंशी ऋतुजा यांच्याबाबत चर्चा केली. यावेळी ऋतुजा लटके उपस्थित नव्हत्या अशीही माहिती समोर आली आहे.

दरम्यान, आज मुंबई हायकोर्टात ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर सुनावणी होणार आहे. बीएमसीने राजीनाम्याचा प्रश्न मुद्दाम लांबवला, असा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. त्याविरोधात दाद मागण्यासाठी आता न्यायालयीन लढाईत कोण बाजी मारतं, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. आजच यावर निर्णय येण्याची शक्यता आहे. कारण येत्या 24 तासांच्या आज अंधेरी पोट निवडणुकीसाठी अर्ज सादर करावा लागणार आहे.