AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Andheri by-election| अंधेरी पोटनिवडणूक – ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं, पुढील २ दिवस महत्त्वाचे

शिंदे आणि ठाकरे गट यांच्यात पुन्हा एकदा राजकीय सामना हा मुंबईतील अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत रंगणार आहे, अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष या लढतीवर असणार आहे.

Andheri by-election| अंधेरी पोटनिवडणूक - ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं, पुढील २ दिवस महत्त्वाचे
| Edited By: Jaywant Patil | Updated on: Oct 11, 2022 | 10:25 PM
Share

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना उमेदवारी अर्ज भरण्यास अडचण येत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता अवघे ३ दिवस शिल्लक राहिले आहेत. ऋतुजा लटके या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवार असणार आहेत. ऋतुजा रमेश लटके या मुंबई महापालिकेत नोकरी करत होत्या, त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. पण तो राजीनामा अजून मंजूर करण्यात आलेला नाही. तो अर्ज मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा जोपर्यंत मंजूर होत नाही, तोपर्यंत त्यांना विधानसभेच्या अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरता येणार नाही.

हा राजीनामा तातडीनं मंजूर व्हावा म्हणून शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महत्त्वाचे मानले जाणारे नेते, अॅड अनिल परब यांनी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांची काल मुंबई महापालिकेत जावून भेट घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे.

महापालिका प्रशासनाच्या नियमानुसार नोकरीचा राजीनामा किंवा स्वेच्छा निवृत्तीचा राजीनामा ३ महिन्याच्या आत कधीही मंजूर केला जावू शकतो. ठाकरे गटाच्या हाती तीन दिवस आहेत, आणि ते अतिशय महत्त्वाचे आहेत. कारण राजीनामा मंजूर झाल्याशिवाय ऋतुजा लटके या आपला उमेदवारी अर्ज दाखल करु शकत नाहीत.

याआधीच मुंबईतील अंधेरी पोटनिवडणूक ही सध्याच्या राजकीय स्थितीवर अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. मुंबई महापालिकेसाठी ही लिटमस टेस्ट आणि शिंदेगट शिवसेना ठाकरे गटापासून दूर गेल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे, त्यामुळे जनमत नेमकं कोणत्या गटाच्या किंवा पक्षाच्या बाजून आहे, हे दिसून येणार आहे. शिवसेनेचे तत्कालीन आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी विधानसभेची जागा रिक्त झाली होती. ही निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष लढवणार असल्याचं स्पष्ट आहे, तसेच शिवसेना- ठाकरे गटाच्या उमेदवार ह्या ऋतुजा रमेश लटके या असणार असल्याचंही स्पष्ट आहे.

पण या विरोधात शिंदेगट मैदानात उमेदवार उतरवणार की, भाजपा हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण ही निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना-ठाकरेगट एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट आहे, तर दुसरीकडे भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना – शिंदेगट ही निवडणूक एकत्र लढणार असल्याचं स्पष्ट आहे.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?