एकवेळ अनुपम खेर यांच्या टकलावर नवे केस येतील, पण टीएमसी पुन्हा नाही…भाजपा नेत्याच्या दाव्याने खळबळ

भाजपचा हा विजय अनेक बाबतीत ऐतिहासिक मानला जात आहे. १९७२ नंतर पहिल्यांदा पश्चिम बंगालात असे सरकार स्थापन होणार आहे जे केंद्रातही सत्तेत आहे. यामुळे प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

एकवेळ अनुपम खेर यांच्या टकलावर नवे केस येतील, पण टीएमसी पुन्हा नाही...भाजपा नेत्याच्या दाव्याने खळबळ
anupam kher
| Updated on: May 05, 2026 | 6:40 PM

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूकांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठा विजय मिळाल्यानंतर राजकीय शेरेबाजी वाढली आहे. बंगालचे भाजपा अध्यक्ष समीक भट्टाचार्य यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, ‘अनुपम खेर यांच्या डोक्यावर नवे केस येऊ शकतात, मात्र, टीएमसी आता पुन्हा कधी सरकार बनवू शकणार नाही.’ यावरुन आता राजकीय शेरेबाजी वाढली आहे. स्वत: भाजपाचे चाहते असलेल्या अभिनेते अनुपम खेर यांनी देखील आपली बाजू मांडली आहे.

बंगालचे भाजपा अध्यक्ष समीक भट्टाचार्य यांनी कोलकाता येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की ९ मे एक शुभ दिवस आहे. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या भूमिवर त्यांच्या विचारधारेची सरकार बनत आहे, ज्याचा साक्षीदार संपूर्ण देश असणार आहे. समीक भट्टाचार्य म्हणाले की अनुपम खेर यांच्या टकलावर नवे केस उगवू शकतात.मात्र, टीएमसी बंगालमध्ये पुन्हा कधीच सरकार बनवू शकणार नाही.’

भाजपाने २०७ जागा जिंकून बंगालमध्ये स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर तृणमूल काँग्रेसचा ८० जागांत खेळ आटोपला आहे. राजारहाट न्यू टाऊन जागेवर भाजपाचे उमेदवार पीयूष कनोडिया यांचा ३१६ मतांनी विजय झाला आहे. या निकालांनी पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा बदल पहायला मिळत आहे आणि भाजपा प्रथमच राज्यात सरकार बनवणार आहे.

अनुपम खेर म्हणाले की मी काय बिघडवले…

दुसरीकडे अभिनेते अनुपम खेर यांनी देखील या वक्तव्यावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले तुम्हा का माझ्या डोक्यावर केस उगवावेसे वाटत आहे. मी काय तुमचे बिघडवले आहे. अनुपम खेर म्हणाले की,’ अरे भैयाजी मी काय तुमचे बिघडवले आहे. तुम्ही का माझ्या डोक्यावर केस उगवू इच्छीता, सध्याच्या स्थितीत मला ते आजन्म नकोत.जय श्री राम!’

भाजपाने दोन तृतीयांश मते मिळवली

पश्चिम बंगालमध्ये भाजपाने विधानसभा निवडणूकीत ऐतिहासिक विजय मिळवत २०७ जागा मिळवल्या आहेत. येथे १४५ मतांचे बहुमताचा आकडा असताना भाजपाचे सरकार आरामात स्थापन होणार आहे. या विजयाने २९४ सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत भाजपाने दोन तृतीयांश मते मिळवली आहेत. तर तृणमुल काँग्रेसला ८० जागांवर समाधान मानावे लागले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना सुवेंदु अधिकारी यांच्याशी पराजयाचा सामना करावा लागला आहे.

Follow Us