Pratap patil Chikhalikar : अशोक चव्हाण यांना भाजप प्रवेशाची अप्रत्यक्षपणे ऑफर, खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

| Updated on: Jul 11, 2022 | 9:59 AM

खासदार प्रताप पाटील चिखलीकर कार्यक्रमात बोलत असताना त्यांचं आणि माझं काही भांडण नाही. मला कोणीही शिव्या द्या पण भाजपला मदत करा मी त्याचे आभार मानणार आहे.

Pratap patil Chikhalikar : अशोक चव्हाण यांना भाजप प्रवेशाची अप्रत्यक्षपणे ऑफर, खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
अशोक चव्हाण यांना भाजप प्रवेशाची अप्रत्यक्षपणे ऑफर, खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नांदेड – नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap patil chikhalikar) यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (ashok chavan) यांना भाजप (bjp) प्रवेशाची अप्रत्यक्षपणे ऑफर दिली आहे. नांदेडमध्ये एका खाजगी कार्यक्रमात बोलताना चिखलीकर यांनी ही ऑफर दिली आहे. चव्हाण यांची गेल्या काही दिवसातील भूमिका भाजपला मदत करणारी आहे असे वक्तव्य चिखलीकरांनी यावेळी केलं असल्याचे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. खासदार चिखलीकर यांचे हे भाषण सध्या सोशल मीडियावर चांगलच व्हायरल झालं आहे. त्यामुळे अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार का अशी चर्चा नांदेडमध्ये सुरु झाली आहे. मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. त्यामुळे नव्या राजकीय घडामोडी नेहमी उघडकीस येत आहेत.

नेमकं काय म्हणाले भाजपाचे खासदार

खासदार प्रताप पाटील चिखलीकर कार्यक्रमात बोलत असताना त्यांचं आणि माझं काही भांडण नाही. मला कोणीही शिव्या द्या पण भाजपला मदत करा मी त्याचे आभार मानणार आहे. अशोक चव्हाणांनी काल भारतीय जनता पक्षाला जाहीरपणे मदत केली. बहुमत सिद्ध करताना चार आमदारांना मतदानाला येऊ दिलं नाही. आता याच्यापेक्षा मोठं काय होऊ शकतं. आपण बघितलं की उद्धव साहेबांची शेवटची कॅबिनेट झाली. त्यावेळी शेवटच्या कॅबिनेटमध्ये निर्णय झाला. औरंगाबादचं नामकरण केलं संभाजीनगर, उस्मानाबादचं धारशीव ही मागणी कोणाची होती. बाळासाहेबांच्या शिवसेनेची आणि भाजपची होती. त्याही मागण्यांना अशोकरावांनी पाठींबा दिला. त्यामुळे काल झालेल्या पत्रकार परिषदेत मी त्यांचे आभार मानले आहेत. मला काल काही पत्रकार मित्रांनी विचारलं की ते जर भाजपमध्ये आले तर…माझा पक्ष मोठा होत असेल तर कोणीही आलं तरी मला काय फरक पडणार आहे. उद्या ते आले तरी माझचं काम करतील. त्यामुळे इथे कोणी येऊ नये, यावं याला काही बंधन नाही.

हे सुद्धा वाचा

अप्रत्यक्ष मदत केल्याने चर्चा

मागच्या काही दिवसात भाजपला अप्रत्यक्ष मदत केली असल्याचं खासदारांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्यांनी जाहीर सभेत त्यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.  खासदाराचा व्हिडीओ सध्या नांदेडमध्ये सगळी फिरत आहे. त्याचबरोबर त्यांंच्या वक्तव्याची चर्चा देखील आहे. मागतच्या काही दिवसात अशोक चव्हाण यांनी कशी मदत केली याची देखील चर्चा आहे.