…म्हणून आम्ही राज्यपालांना भेटू शकलो नाही : बाळासाहेब थोरात

सर्व उमेदवार निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब देण्यासाठी मतदारसंघात जाणार आहे. म्हणून ही भेट रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी (meeting with governor at next week) दिली.

...म्हणून आम्ही राज्यपालांना भेटू शकलो नाही : बाळासाहेब थोरात


शिर्डी : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आज राज्यपालांना भेटणार होते. मात्र महासेना आघाडीची राज्यपालांची भेट अचानक रद्द झाली (meeting with governor at next week) आहे. मात्र “निवडणूक आयोगाला हिशोब देण्याचे शेवटचे दिवस आहेत. त्यामुळे सर्व उमेदवार निवडणुकीच्या खर्चाचा हिशोब देण्यासाठी मतदारसंघात जाणार आहे. म्हणून ही भेट रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी (meeting with governor at next week) दिली. तसेच येत्या आठवड्यात राज्यपालांची भेट घेण्यात येणार आहे,” असेही त्यांनी (meeting with governor at next week) सांगितले.

“राजभवनात राज्यपालांची भेट घेण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने एकत्रित वेळ मागितला होता. मात्र निवडणूक आयोगाला हिशोब देण्याचे शेवटचे दोन-तीन दिवस शिल्लक आहेत. यामुळे सर्व उमदेवारांना मतदारसंघात जाण्यास सांगितले आहे. यादृष्टीने ही भेट रद्द करण्यात आली आहे. तसेच पुढील आठवड्यात राज्यपालांचा वेळ घेत महासेनाआघाडीचे नेते एकत्रित भेट घेतील,” अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

“काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र येणार आहेत. या पक्षांची विचारधारा वेगवेगळी असल्याने कोणतीही घाई न करता आम्ही एकत्र येणार आहोत. तसेच यासाठी वेळ आवश्यक आहे,” असेही ते म्हणाले.

“शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष राज्यघटनेला धरुन चालत आहेत. राज्यघटनेचा मुलभूत तत्त्वांचा बळकट धागा आमच्यात आहे. त्यामुळे आम्ही सरकार यशस्वीपणे चालवू शकतो,” अशीही माहिती बाळासाहेब थोरात यांनी (meeting with governor at next week) दिली.

राज्यपालांसोबतची भेट रद्द

महासेना आघाडीची राज्यपालांची भेट अचानक रद्द झाली आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आज राज्यपालांना (meeting with governor postponed ) भेटणार होते, मात्र ही भेट पुढे ढकलण्यात आली आहे. महासेनाआघाडीचे नेते ओल्या दुष्काळासंदर्भात राज्यपालांना (meeting with governor postponed ) भेटणार होते. त्यासाठी तीनही पक्षांचे नेते एकत्र जमत होते, मात्र ऐनवेळी ही भेट रद्द झाली.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आज दुपारी तीन वाजताची वेळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मागितली होती. राजभवनावर तिन्ही पक्षांकडून नेमके कोणते नेते जाणार, हे स्पष्ट नव्हतं. मात्र तिन्ही पक्षाचे नेते पहिल्यांदाच उघडपणे एकत्र राज्यपालांची भेट घेणार होते, त्यामुळे या भेटीकडे राज्याचं विशेष लक्ष होतं.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI