AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तृणमूल काँग्रेसचा प्रचार करणाऱ्या बांग्लादेशी कलाकारांचा व्हिसा रद्द

कोलकाता : सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अनेक उमेदवार जोरदार प्रचार करताना दिसत आहे. निवडणुकांसाठी प्रचार करताना अनेक नेते-मंडळी सिनेमातील कलाकारांचा सर्रास वापर करत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रचारासाठी काही दिवसांपूर्वी बांग्लादेशी कलाकारांचा वापर केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर विरोधकांनी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात […]

तृणमूल काँग्रेसचा प्रचार करणाऱ्या बांग्लादेशी कलाकारांचा व्हिसा रद्द
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM
Share

कोलकाता : सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अनेक उमेदवार जोरदार प्रचार करताना दिसत आहे. निवडणुकांसाठी प्रचार करताना अनेक नेते-मंडळी सिनेमातील कलाकारांचा सर्रास वापर करत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रचारासाठी काही दिवसांपूर्वी बांग्लादेशी कलाकारांचा वापर केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर विरोधकांनी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून भारतीय राजकारणात हस्तक्षेप करणाऱ्या बांगलादेशी कलाकारांचा व्हिसा VISA रद्द केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील रायगंज परिसरात टीएमसीचे उमेदवार कन्हैय्या लाल यांचा बांग्लादेशी अभिनेता फिरदौस अहमद आणि गाजी अब्दुन नूर हे दोघेही प्रचार करताना दिसत होते. त्यावेळी त्यांनी फिरदोस अहमदने पश्चिम बंगालच्या रायगंज मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला मत देण्याचे आवाहन केले होते. यानंतर भाजपसह विरोध पक्षांनी निवडणूक आयोगाकडे या विरोधात तक्रार दाखल केली होती. यावेळी हे बांग्लादेशी कलाकार कोणत्या अधिकारे एखाद्या पक्षाचा प्रचार करु शकतात असा प्रश्नही भाजपने विचारला होता.

यानंतर निवडणूक आयोगाने तात्काळ या प्रकरणाची दखल घेतली होती. तसेच याबाबत गृहमंत्रालयाने सिलीगुडी प्रशासनाकडून याबाबत अहवाल मागितला होता. अद्याप प्रशासनाने याबाबतच अहवाल सादर केलेला नाही.

तर दुसरीकडे बांग्लादेशाच्या उच्चायुक्तांनी फिरदौस अहमदला तात्काळ मायदेशी परतण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता परराष्ट्र मंत्रालयानेही भारतीय राजकारणात हस्तक्षेप करणाऱ्या बांगलादेशी कलाकारांचा व्हिसा रद्द करावा असे आदेश दिले आहेत. फिरदौस हे बिजनेस व्हिसावर भारतात आले होते व त्यांनी निवडणूक आयोगाच्या नियमाविरुद्ध प्रचारसभेत सहभाग घेतला. त्यामुळे त्यांचा व्हिसा तात्काळ रद्द करण्यात यावा आणि त्यांनी तात्काळ मायदेशी परतावे असे आदेश परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीदरम्यान तृणमूल काँग्रेसला धक्का बसला आहे.

Follow Us
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न.

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या