AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रकाश आंबेडकरांकडून सुप्रिया सुळेंविरोधात उमेदवार जाहीर

कोल्हापूर : भारिपचे प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राज्यभरात सभा घेत आहेत. कोल्हापुरातल्या सभेत त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातले उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे त्यांची आघाडीत येण्यासाठी चर्चा सुरु असतानाच त्यांनी आघाडीचा बालेकिल्ला असलेल्या काही मतदारसंघांचेही उमेदवार जाहीर करुन टाकले आहेत. प्रकाश आंबेडकर आघाडीत येण्यासाठी 12 जागा देण्याच्या अटीवर ठाम आहेत. बहुजन वंचित आघाडीकडून साताऱ्यासाठी सहदेव […]

प्रकाश आंबेडकरांकडून सुप्रिया सुळेंविरोधात उमेदवार जाहीर
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM
Share

कोल्हापूर : भारिपचे प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राज्यभरात सभा घेत आहेत. कोल्हापुरातल्या सभेत त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातले उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे त्यांची आघाडीत येण्यासाठी चर्चा सुरु असतानाच त्यांनी आघाडीचा बालेकिल्ला असलेल्या काही मतदारसंघांचेही उमेदवार जाहीर करुन टाकले आहेत. प्रकाश आंबेडकर आघाडीत येण्यासाठी 12 जागा देण्याच्या अटीवर ठाम आहेत.

बहुजन वंचित आघाडीकडून साताऱ्यासाठी सहदेव ऐवळे, माढ्यासाठी विजय मोरे, सांगलीसाठी जयसिंग उर्फ तात्या शेंडगे, बारामतीसाठी नवनाथ विष्णू पडळकर, पुण्यासाठी विठ्ठल लक्ष्मण सातव असे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भारिपला एमआयएमचाही पाठिंबा आहे. त्यामुळे भारिपने स्वबळावर सर्व ठिकाणी तयारी सुरु केली आहे.

वाचाबारामती लोकसभा : जानकरांनी दमछाक केली, पण यंदा सुप्रिया सुळेंचा मार्ग सुकर

आघाडीसोबत चर्चा सुरु असताना हे उमेदवार जाहीर केल्याने भारिपला खरंच आघाडीत जायचंय का असा प्रश्न निर्माण झालाय. कारण, माढा, बारामती, सातारा हे असे लोकसभा मतदारसंघ आहेत, जिथे मोदी लाटेतही भाजपच्या उमेदवाराचा सुपडासाफ झाला होता. तरीही या मतदारसंघांमध्ये भारिपने उमेदवार जाहीर केले आहेत.

वाचामाढा लोकसभा : मोदी लाटेतही टिकलेले मोहिते-पाटील पुन्हा गड राखणार?

भारिपला आघाडीत घेण्यासाठी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रकाश आंबेडकरांना भेटले होते. पण 12 जागांच्या मागणीवर प्रकाश आंबेडकर ठाम आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतच एका-एका जागेसाठी संघर्ष सुरु असताना आघाडी भारिपला 12 जागा देण्याच्या मूडमध्ये दिसत नाही. त्यामुळेच प्रकाश आंबेडकरांनी स्वबळावर तयारी सुरु केली आहे.

वाचासातारा लोकसभा : राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध, तरीही राजे साताऱ्यातून लढणारच!

दरम्यान, यापूर्वीही प्रकाश आंबेडकरांनी काही मतदारसंघांमध्ये उमेदवार जाहीर केले आहेत. बुलडाण्याचाही उमेदवार यापूर्वीच जाहीर झाला होता. तर अकोल्यातून प्रकाश आंबेडकर स्वतः लढतील हे जवळपास निश्चित मानलं जातंय. त्यामुळे आघाडीच्या अगोदरच भारिपने उमेदवार जाहीर केले आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...