AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसला जिंकवण्यासाठी राऊतांकडून महाराष्ट्र एकीकरण समितीची दिशाभूल : निलेश राणे

संजय राऊत यांनी स्वतः बेळगावात जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी प्रचार केला आहे. (Nilesh Rane accuses Sanjay Raut)

काँग्रेसला जिंकवण्यासाठी राऊतांकडून महाराष्ट्र एकीकरण समितीची दिशाभूल : निलेश राणे
माजी आमदार निलेश राणे, शिवसेना खासदार संजय राऊत
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Apr 16, 2021 | 1:20 PM
Share

मुंबई : काँग्रेसला जिंकवण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीत फूट पाडण्याचे काम केले. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार बेळगावात हरला, तर फक्त शिवसेना जबाबदार असेल, अशा शब्दात माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडले. संजय राऊत यांनी स्वतः बेळगावात जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी प्रचार केला आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकांच्या प्रचारतोफा थंडावल्या आहेत. (BJP former MP Nilesh Rane accuses Shivsena MP Sanjay Raut over Belgaum bypoll)

“महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार बेळगावात हरला तर फक्त शिवसेना जबाबदार. काँग्रेसला जिंकवण्यासाठी संजय राऊत यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीची दिशाभूल केली आणि महाराष्ट्राची बाजू कमजोर करण्याचं पाप शिवसेनेने केले. जी एकी समितीमध्ये होती, त्याच्यामध्ये फूट पाडण्याचे काम राऊतांनी केले.” असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

बेळगावात तिरंगी लढत

भाजप खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या 17 एप्रिलला बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून 2 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी आणि काँग्रेसचे आमदार सतीश जारकीहोळी रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके अशी टक्कर आहे.

शिवसेनेची माघार

शिवसेनेतर्फे के. पी. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र मराठी मतांची विभागणी टाळण्यासाठी त्यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यानंतर शिवसेनेने महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे बेळगाव पोटनिवडणुकीची लढत तिरंगी झाली आहे. काँग्रेसचे सतीश जारकिहोळी हे मूळचे गोकाक भागातील असल्याने त्यांना गोकाक आणि अरभावीतील मतदारांसह कन्नड भाषिक तसेच दलित आणि मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहे. एकूण 10 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.

कोण आहेत शुभम शेळके?

शुभम शेळके यांचं वय अवघे 26 वर्ष आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने शुभम विक्रांत शेळके यांचा फॉर्म भरला होता. समिती कार्यकर्त्यांनींच त्यांचं डिपॉझिट भरले. सर्वसामान्य कुटुंबातील असणारे शुभम शेळके यांचा लहानपणापासूनच सीमाप्रश्न जवळचा संबंध होता. (BJP former MP Nilesh Rane accuses Shivsena MP Sanjay Raut over Belgaum bypoll)

कोण होते सुरेश अंगडी?

सुरेश अंगडी यांनी सलग चार वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. 2004 मध्ये ते भाजपचे जिल्हाध्यक्ष होते, त्याचवेळी पक्षाने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली. तत्कालीन खासदार अमरसिंग पाटील यांचा पराभव करून अंगडी लोकसभेवर निवडून गेले. सुरेश अंगडी यांच्या विजयात मराठी मतांचा वाटा सर्वाधिक होता. 2004 पाठोपाठ 2009 आणि 2014 मध्येही त्यांना मराठीबहुल भागात सर्वाधिक मते मिळाली. 2019 मध्ये मराठीबहुल भागात त्यांचे मताधिक्‍य कमी होईल, असा दावा विरोधकांकडून केला जात असताना उलट त्यांचे मताधिक्‍य वाढले होते.

संबंधित बातम्या:

कोण आहे शुभम शेळके, ज्याला जिंकवण्यासाठी संजय राऊत, तर हरवण्यासाठी फडणवीस जीवाचं रान करतायत?

महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके जिंकणार का?, काय आहे बेळगाव लोकसभा मतदारसंघाचं गणित?; वाचा सविस्तर

(BJP former MP Nilesh Rane accuses Shivsena MP Sanjay Raut over Belgaum bypoll)

Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!